Download App

परमबीर सिंह खोटारडे, दिशाभूल करताहेत; ‘त्या’ आरोपांवर सलील देशमुखांचं स्पष्टीकरण

परमबीर सिंह खोटारडे, दिशाभूल करताहेत, असं स्पष्टीकरण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी दिलंय.

Salil Deshmukh On Parambir Singh : परमबीर सिंह खोटारडे असून दिशाभूल करत असल्याचं स्पष्टीकरण माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे चिरंजीव सलील देशमुख (Salil Deshmukh) यांनी दिलंय. दरम्यान, माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांनंतर केस मागे घेण्यासाठी सलील देशमुख हाता-पाया पडत असल्याचा दावा सिंह यांनी केला होता. त्यावर बोलताना सलील देशमुख यांनी दावा खोडून काढलायं.

दोन वर्षात लाडकी बहिण आठवली नाही, पण लोकसभेनंतर…; पृथ्वीराज चव्हाणांचा अजितदादांना टोला

सलील देशमुख म्हणाले, परमबीर सिंह खोटारटडे आहेत ते दिशाभूल करत आहेत. समित कदम यांची नार्को टेस्ट करा. एनआयएपासून वाचण्यासाठी परमबीर सिंह यांनी असे आरोप केले आहेत. वास्तविक अॅंटिलिया बॉम्ब प्रकरणाचा मास्टरमाईड परमबीर सिंह हा असून याबाबतचे सर्व पुरावे आहे. डीवायएसपी आणि डीसीपीने याबाबत सांगितलं होतं. परमबीर सिंह यांनी सर्व गोष्टी फेक घडवून आणल्या होत्या. एनआयएपासून वाचण्यासाठीच सिंह यांनी देशमुख यांच्यावर आरोप केले असल्याचं सलील देशमुख यांनी स्पष्ट केलंय.

बिग बींचं नाव घेतलं तरीही का चिडतात जया बच्चन? जाणून घ्या, राज्यसभेत काय घडतंय…

परमबीर सिंह यांचे आरोप काय?
सलील देशमुख मला वरळीमधील कॉफी शॉपमध्ये भेटले होते. त्या भेटीत सलील माझ्या गयावया करु लागला. मला खटला मागे घेण्याची सारखी विनंती करत होता. माझ्या पाया पडत होता. आमची चूक झाली, आम्हाला माफ करा. हवे तर अनिल देशमुखसुद्धा तुमची माफी मागतील. तुम्हाला डीजी केले जाईल. परंतु आपण त्यांचे सर्व प्रस्ताव फेटाळले, असा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता.

परमबीर सिंह तीन वर्ष खोटं बोलले – अंधारे
परमबीर सिंह तीन वर्ष न्यायालयासमोर खोटं बोलत होते. सिंह यांना आधीच माहिती होती तर त्यांनी ही माहिती न्यायालयासमोर सादर का केली नाही? त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा कोणता ट्रीगर दाबला होता? की अद्याप स्क्रिप्ट तयार झाली नाही, असं त्यांनी सांगितलं असावं. सिंह यांचे आजचे स्टेटमेंट पाहून न्यायलायने त्यांची पुन्हा कस्टडी घेतली पाहिजे, असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलंय.

follow us