केस मागे घेण्यासाठी सलील हातापाया पडत होता; वाझेंपाठोपाठ परमबीर सिंहही अॅक्टिव्ह
Parambir singh : केस मागे घेण्यासाठी सलील हातापाया पडत होता, असा दावा माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह(Parambir Singh) यांनी केलायं. दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या सचिन वाझे यांनी आरोप केले होते. या आरोपांनंतर अनिल देशमुख यांनीही परमबीर सिंह यांच्यावर आरोप केले. या आरोपांवर प्रत्युत्तर देताना सिंह यांनी अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख मला भेटून केस मागे घेण्यासाठी हातापाया पडत असल्याचं सिंह यांनी सांगितलंय.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर; मंत्री विखेंचा हल्लाबोल
परमबीर सिंह पुढे बोलताना म्हणाले, अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांना अटक होण्याआधी त्यांचा मुलगा सलील देशमुख मला मुंबईतील एका कॅफेमध्ये भेटला. या भेटीमध्ये सलीलने मला वडिलांविरोधातील केस मागे घेण्यासाठी विनवणी केली होती. त्यावेळी सलील माझ्या हातापाया पडून केस मागे घेण्यासाठी विनंती करत असल्याचं परमबीर सिंह यांनी सांगितलंय.
पूजा खेडकरने सगळ्यांनाच कोर्टात खेचलं; UPSC पासून राज्य सरकापर्यंत एकालाही नाही सोडलं
तसेच देशमुखांविरोधातील तेस मागे घेण्यासाठी मला संजय पांडे याने धमकावलंही होतं. यांसदर्भआतील कॉल रेकॉर्डिंग मी सीबीआयसह, न्यायालयात दिले आहेत. माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी संजय पांडे याच्यासह इतर गुन्हेगारांची अनिल देशमुख यांच्या घरी बैठक झाली होती. या बैठकीत अनिल देशमुख यांनी माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याबाबतच्या सूचना दिल्या असल्याचंही परमबीर सिंह यांनी सांगितलंय.
video: मेट्रोमध्येच भिडलं जोडपं; ‘माझ्या आयुष्यातून निघून जा’; एकमेकांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल
…तर नार्को टेस्ट करा
मला टार्गेट केलं जात होतं. मी केस काढली नाही तर माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करणार असल्याचं देशमुखांकडून सांगण्यात आलं होतं, पण मी न घाबरता प्रकरणाचा पूर्ण तपास केला होता. माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी अनिल देशमुख यांच्या घरी संजय पांडेंसह इतर गुन्हेगारांची बैठक झाली होती. या बैठकीत अनिल देशमुख यांनी त्यांना सूचना दिल्या होत्या. याबाबत खोटं असेल तर अनिल देशमुख, सलील देशमुख, संजय पांडे यांच्यास माझी नार्को टेस्ट करावी, असं परमबीर सिंह म्हणाले आहेत.