संसदेत अनुराग ठाकूर यांनी काढली जात अन् राहुल गांधी भडकले, म्हणाले, माझ्यावर …

Anurag Thakur On Rahul Gandhi : संसदेचा अर्थसंकल्प अधिवेश सुरु असून सध्या या अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा होत आहे.

Anurag Thakur On Rahul Gandhi : संसदेत अनुराग ठाकूर यांनी काढली जात अन् राहुल गांधी भडकले, म्हणाले, माझ्यावर ...

Anurag Thakur On Rahul Gandhi : संसदेत अनुराग ठाकूर यांनी काढली जात अन् राहुल गांधी भडकले, म्हणाले, माझ्यावर ...

Anurag Thakur On Rahul Gandhi : संसदेचा अर्थसंकल्प अधिवेश सुरु असून सध्या या अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा होत आहे. या चर्चेत  29 जुलै रोजी लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाग घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होते. तर आज (30 जुलै) रोजी भाजप खासदार अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी या चर्चेत भाग घेत राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिला आहे.

केंद्र सरकारवर टीका करत राहुल गांधी यांनी सरकारच्या या बजेटला ‘हलवा बजेट’ म्हणत त्यामध्ये एकही दलित अधिकारी नसल्याची टीका त्यांनी केली होती. तर आता राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देत अनुराग ठाकूर म्हणाले की, राहुल जी हवाला गोड होता का? आज काही लोक ओबीसीबद्दल बोलत आहे मात्र त्यांच्यासाठी ओबीसी (OBC) म्हणजे ओन्ली फॉर ब्रदर इन लॉ कमिशन. असं आहे. ज्या पक्षाने आपल्या अध्यक्षाला फक्त मागासलेल्या समाजातून आल्याने त्यांना बाहेर काढले होते त्या पक्षाचे राजपुत्र आज आपल्या ज्ञान देत आहे. असं अनुराग ठाकूर म्हणाले.

पुढे बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेतेपदाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. आज ओबीसी आणि जगणनेची चर्चा खूप होत आहे. मात्र ज्यांना त्यांची जात माहिती नाही ते जनगणनेबद्दल बोलत आहे असं अनुराग ठाकूर म्हणाले. मात्र यानंतर संसदेत काँग्रेस खासदारांकडून गोंधळ सुरु करण्यात आला तर राहुल गांधी देखील आक्रमक भूमिकेत दिसून आले. तुम्ही माझ्यावर कितीही टीका करा मात्र मी या देशातील दलित-आदिवासींचा प्रश्न या संसदेत मांडणार आणि जात जनगणना करून घेणार असं राहुल गांधी म्हणाले.

तसेच अनुराग ठाकूर यांनी माझा इन्सल्ट केला आहे. तसेच दलित, ओबीसींवर बोलणाऱ्यांना शिवी खावीच लागते, पण मला कितीही शिव्या द्या तरी मी मागे हटणार नाही असं देखील राहुल गांधी म्हणाले.

तर राहुल गांधी यांच्या चक्रव्यूहबाबत देखील अनुराग ठाकूर यांनी टीका करत म्हणाले की, पहिल्या चक्रव्यूहमुळेच देशाची फाळणी झाली तर दुसऱ्या चक्रव्यूहमुळे काश्मीरची समस्या देशाला मिळाली आणि भारताची भूमी चीनला गेली. तर तिसऱ्या चक्रव्यूहमुळे माजी पंतप्रधानांनी देशात आणीबाणी आणि पंजाबमध्ये अशांतता दिली. चौथ्या चक्रव्यूहमुळे देशाला बोफोर्स आणि शिखांची कत्तल मिळाली.

‘नाहीतर शरद पवारांना त्रास होईल’, विद्या चव्हाणांच्या गंभीर आरोपांवर चित्रा वाघांचा प्रत्युत्तर

तर पाचवे जो SG आहे त्यांनी सनातन धर्म परंपरेबद्दल द्वेष पसरवला आणि 12 लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्यांना संरक्षण दिले. आणि सहावा चक्रव्यूह तुम्ही स्वतः आहे. या पाच चक्रव्यूहांनी मिळून जे नुकसान केले नाही त्यापेक्षा जास्त नुकसान तुम्ही देशाच्या राजकारणाचे आणि संसदीय परंपरेचे गेल्या 15 वर्षांत केले . तर सातव्या चक्रव्यूहचा मी नाव नाही घेणार. देशाला या सात चक्रव्यूहांनी मिळून गरिबी, उपासमार, दहशतवाद अशा गोष्टी दिल्या अशी टीका भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.

Exit mobile version