Arun Munde : शेवगाव – पाथर्डी मतदारसंघातून 2014 व 2019 ला भारतीय जनता पार्टीच्या (BJP) उमेदवाराला निवडून देण्यासाठी पक्षाने मेहनत घेतली. मात्र मतदारसंघात रखडलेल्या विकास पाहता आता बदलाची गरज आहे अशी जनभावना आहे. त्यामुळे प्रलंबित काम व विकास होण्यासाठी भाजपाने संधी द्यावी अशी भावना भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे (Arun Munde) यांनी व्यक्त केली.
येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक आहे. त्यापूर्वीचा शेवगाव – पाथर्डी मतदारसंघांमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. विद्यमान आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांच्या विरोधात पक्षातूनच आता अरुण मुंडे यांनी दंड थोपटले आहे. शेवगाव शहरांमध्ये निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी विधानसभेचे रणशिंग देखील फुंकले. तसेच राजळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत पक्षाने आपल्याला संधी द्यावी असे देखील यावेळी मुंडे म्हणाले.
यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की, गेली पंचवीस वर्षे आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. जनतेला बदल हवा आहे नाहीतर जनता निवडणुकीच्या माध्यमातून बदल करेल. भाजपचे एकनिष्ठ उमेदवाराच्या पाठीशी जनता ही उभे राहील असे देखील यावेळी बोलताना मुंडे म्हणाले.
विद्यमान आमदारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये काय भूमिका निभावली याबाबत माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्याकडे देखील रेकॉर्ड आहेत. तसेच पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, या कारखानदारांना कंटाळली आहे. भाजपने जनतेच्या मनातील भूमिका ओळखून निर्णय घ्यावा. आज घेतलेला मेळावा हा जनतेच्या मनातील आमच्या मनातील खंत आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत.
‘मी रस्त्याने येणार होतो,मात्र रस्ता खराब …’, आठवलेंनी दिला सरकारला घरचा आहेर
पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे मात्र विद्यमान आमदारांना तिकीट मिळालं तर ते सोडून पक्षाचा आदेशाचे पालन करेन. विद्यमान आमदारांना सोडून कोणालाही तिकीट द्यावे अशा शब्दातच एक प्रकारे भाजपचे सरचिटणीस अरुण मुंडे यांनी विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे.