Download App

Arvind savant : राधाकृष्ण विखे म्हणजे पक्ष बदलणारा ‘सरडा’

Arvind savant On Radhakrush Vikhe Patil : नुकतच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बंडखोरी, हिंदुत्व, काँग्रेसबरोबर ठाकरे का गेले असा प्रश्न विद्यार्थ्याने विचारला होता. त्याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, 20 मे रोजी एकनाथ शिंदे यांना वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरेंनी बोलवलं होतं.

नक्की गडबड कशामुळे सुरु आहे? त्यांना बंडखोरी का करावी वाटते? पक्षात राहायचे आहे का? मुख्यमंत्री व्हायचे आहे का? नक्की काय भीती आहे, असे त्यांना विचारले होते. हे सर्वांना माहिती आहे. पडद्याच्या आड रात्री उडी घालून कोणाला भेटायचे हे आम्हाला माहिती नव्हते. कुरबूर सुरु होती. काही आमदार आम्हाला सांगत होते. त्यासाठी उद्धवसाहेबांनी त्यांना बोलवले होते, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

सोडून गेलात ना, आता दुप्पट आमदार निवडून आणणार! ; Aaditya Thackeray यांचे ‘चॅलेंज’

आदित्य ठाकरेंच्या या दाव्यावरून शिंदे आणि भाजपच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यामध्ये भाजपचे मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदित्य ठाकरेंना प्रतिउत्तर दिले होते विखे म्हणाले होते की. ‘ सत्ता गेली तरी आदित्य ठाकरेंचा पोरखेळ गेलेला नाही. एकनाथ शिंदे हे रडणारे नाही तर लढणारे नेते आहेत. याची प्रचिती महाराष्ट्राने अनुभवली आहे. त्यामुळे त्यांनी वैफल्यग्रस्त होऊन रडू नये. ठाकरेंचा पप्पू होऊ नये.’

आता विखेंच्या उत्तराला ठाकरें गटाच्या अरविंद सावंतानी प्रतिउत्तर देताना थेट विखेंची तुलना प्राण्याशी केली आहे. ते म्हणाले की, ‘राधाकृष्ण विखे पाटील म्हणजे रोज रंग बदलणारा सरड्या सारखे आहेत. आज या पक्षातून उद्या त्या पक्षात उड्या मारतात. शिवसेनेतही होते कोणता पक्ष शिल्लक राहिला का विचारा त्यांना’ अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे.

Tags

follow us