Download App

सुनेचा हक्क नाकारणारे, बारामतीच्या लेकीचे अगतिक बाबा; बाहेरुन आलेल्या पवार वादात शेलारांची टीका

Ashish Shelar Criticize Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद आणि भावजय यांच्यातील लढतीवर मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार, या शब्दांत अजित पवार ( Ajit Pawar ) यांना खोचक टोला लगावला होता. त्यावरून सध्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यात भाजप नेते अशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी ट्विट करत शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.

“अशोक चव्हाणांचा फोन, भाजपप्रवेशाची ऑफर दिली, पण मी..”; वसंतरावांचा भर सभेतच गौप्यस्फोट

या ट्विटमध्ये शेलार म्हणाले की, सुनेचा हक्क सासऱ्यांनी नाकारला.अनेकांच्या जाती काढून झाल्यावर घरातच भांडणाचा विषय काढला? काय बोलावे ? प्रश्न आता तमाम पुरोगाम्यांना पडला. वाद लावून झाले.. इतिहास, भूगोल, पगडी आणि टोपीचे.. महाराष्ट्राने पाहिले आज अगतिक बाबा बारामतीच्या लेकीचे! असं म्हणत अशिष शेलार यांनी शरद पवारांना त्यांच्या मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार या विधानावरून टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेत अजित पवार यांनी यावेळी शरद पवारांच्या सून सुनेत्रा पवारांना निवडून द्या असं आवाहन केलं होतं. त्यावर बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. शरद पवार म्हणाले, अजित पवार यांनी शरद पवारांच्या सून सुनेत्रा पवार यांना निवडून देण्याचं आवाहन केलं यामध्ये चुकीचं काही नाही.

BJP Manifesto : रोजगाराची गॅरंटी अन् 3 कोटी घरे; भाजपाच्या ‘मोदी की गॅरंटी’ जाहीरनाम्यात काय काय?

मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार, असा खोचक टोला शरद पवार यांनी अजित पवार यांना लगावला आहे. शरद पवार यांनी बाहेरुन आलेले पवार असा उल्लेख करताच पत्रकार परिषदेतील उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. सोबतच शरद पवार यांनाही हसू आवरलं नसल्याचं पाहायला मिळालं होत.

follow us

वेब स्टोरीज