“अशोक चव्हाणांचा फोन, भाजपप्रवेशाची ऑफर दिली, पण मी..”; वसंतरावांचा भर सभेतच गौप्यस्फोट

“अशोक चव्हाणांचा फोन, भाजपप्रवेशाची ऑफर दिली, पण मी..”; वसंतरावांचा भर सभेतच गौप्यस्फोट

Nanded Lok Sabha Ashok Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मराठवाड्यात काँग्रेसला अनेक धक्के बसले आहेत. या धक्क्यातून सावरत काँग्रेसने ज्येष्ठ नेते वसंतराव चव्हाण यांना तिकीट दिलं आहे. आता याच वसंतराव चव्हाण यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्याबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. अशोक चव्हाण यांनी मला फोन केला आणि भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, असा गौप्यस्फोट वसंतराव चव्हाण यांनी केला. नांदेड जिल्ह्यातील मरकळ येथे आयोजित प्रचारसभेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Ashok Chavan News : ‘और किसीको देखने की जरुरत नही है’ अशोक चव्हाणांची तुफान डायलॉगबाजी 

महाविकास आघाडीने नांदेड मतदारसंघात वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीने विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांनाच पुन्हा मैदानात उतरवलं आहे. यानंतर वसंतराव चव्हाण यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांची प्रचारसभा मरकळ येथे आयोजित करण्यात आली होती.  या सभेत त्यांनी अशोक चव्हाणांबाबत मोठा खुलासा केली.

ते पुढे म्हणाले, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मला अशोक चव्हाणांनी दिल्लीतून फोन केला होता. तुम्ही माझं अभिनंदन केलं नाही असं ते मला म्हणाले. मी म्हणालो तुमचं काय अभिनंदन करू नांदेडला या सविस्तर बोलू. यानंतर त्यांनी मला थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली. मी म्हणालो तुम्ही साधले ते ठीक आहे पण आम्हाला जमणार नाही. जिल्ह्याची काँग्रेस कमिटी हातात घेऊन एकत्रित काम करू. उद्या जनताच तुमचा फैसला करील असे मी त्यांना निक्षून सांगितल्याचे वसंतराव चव्हाण या सभेत म्हणाले.

कॉंग्रेस नेतृत्वाला ग्राउंड रिॲलिटीचे भान नसल्यानेच १७ जागा.. अशोक चव्हाणांची टीका

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज