काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे एका जाहीर कार्यक्रमात केलेल्या आरोपांमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. विनायक मेटेंप्रमाणेच आपल्यालाही संपवण्याचा कट चालू असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यावर आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या आरोपांविषयी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.
अशोक चव्हाण यांच्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात अनेत तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. चर्चेला उधाण आलेले असताना अशोक चव्हाण पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले की, “आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, तसेच विनायक मेटेंप्रमाणेच आपल्यालाही संपवण्याचा कट चालू आहे.” असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला.
त्याचवेळी संबंधित बोगस पत्र तयार करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्यामागचा मूख्य सूत्रधार कोण आहे, हे शोधून काढलं पाहिजे, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. लोकांची मने जिंकता येत नाहीत म्हणून हा प्रयत्न चालू आहे. असंही ते म्हणाले.
यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी सांगितलं की, “एक पत्र माझ्या हातात आलं. त्यात मूळ सहीचं बनावट लेटरपॅड वापरलं गेलंय. त्यावर मराठा समाजाच्या विरोधात मी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिल्याचं भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.जणूकाही मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी माझी भावना असल्याचं त्या मजकुरात नमूद करण्यात आलं होतं.”
MPSC New Syllabus : आयोगाच्या विरोधात राज्य सरकार न्यायालयात जाणार : फडणवीस
ते पुढे म्हणाले की, “माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करून त्या पत्राचा राजकीय फायदा उचलण्यासाठीचा खटाटोप हा त्यातला मुख्य मुद्दा आहे.” असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे.
अशोक चव्हाण यांनी आपला विनायक मेटे करण्याचा प्रयत्न चालू आहे, असा आरोप केला असला तरी त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही. पण अशोक चव्हाण यांचा रोख कोणाकडे आहे याची चर्चा सुरु आहे.
पण अशोक चव्हाण यांचा रोख नांदेडमधील चव्हाण यांचे परंपरागत विरोधक असलेल्या एका बड्या भाजप नेत्यांवर त्यांचा रोख असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या भाजप नेत्याची गेल्या काही दिवसापासून आपल्या बहिणीशी वाद सुरु आहे. त्याचा हा वाद जाहीर कार्यक्रमात देखील दिसून आला होता.
“आम्हाला सांगण्याऐवजी तुझ्या बहिणीला जाऊन सांग ना, आम्हाला काय सांगतो” अशोक चव्हाण यांच्या या वाक्यामुळे अशोक चव्हाण यांचा रोख त्याच भाजप नेत्याकडे असल्याची चर्चा आहे.