MPSC New Syllabus : आयोगाच्या विरोधात राज्य सरकार न्यायालयात जाणार : फडणवीस

MPSC New Syllabus : आयोगाच्या विरोधात राज्य सरकार न्यायालयात जाणार : फडणवीस

पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नवीन अभ्यासक्रम आतापासून लागू न करता २०२५ पसून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्याविरोधात विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. प्रामुख्याने नवीन अभ्यासक्रम (New Syllabus) २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी विद्यार्थी सातत्याने मागणी करत आहे. त्यासाठी आंदोलन देखील करत आहे. मात्र, याबाबत केवळ आश्वासन दिले जात आहे. अद्याप ठोस निर्णय जाहीर केलेला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. राज्य सरकारने याबाबत तातडीने दखल घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, एमपीएससीने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला नाही. एमपीएससीने निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास‌ राज्य सरकार त्या विरोधात न्यायालयात‌ (Court) जाणार आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले.

कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचार सभेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले की, एमपीएससीच्या नवीन अभ्यासक्रमासंर्भात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. त्यांची मागणी आम्ही राज्य लोकसेवा आयोगाला कळवले आहे. मात्र, आयोगाने लवकर निर्णय घेतला नाही तर राज्य सरकार त्याविरोधात न्यायालयात जाईल.

एमपीएससीला नवा अभ्यासक्रम २०२५ नंतर लागू करण्याचे पत्र राज्य सरकारने दिले आहे. त्यानंतर एमपीएससीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात त्यांनी नवा अभ्यासक्रम चालू वर्षापासूनच लागू करण्याचे निश्चित केले आहे. एमपीएससी एक स्वयत्त संस्था आहे. परंतु, मुख्यमंत्री आता पुन्हा एकदा एमपीएससीला पत्र देणार आहेत. त्यानंतरही एमपीएससीने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास राज्य‌ सरकार त्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube