Ashok Chavhan On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्या असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. यामुळे महाविकास आघाडीला डावलत येत्या काळात अजित पवार हे भाजपसोबत दिसणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे राष्ट्रवादीत अस्वस्थ आहे अशा चर्चा समोर आल्या आहेत. यातच भाजपचे नेतेमंडळी देखील कोणी आमच्या सोबत येणार असेल तर त्यांचे स्वागतच आहे, असे म्हणत एक प्रकारे या बातम्यांना हवा देत आहे. यामुळे अजित पवार पुन्हा एकदा बंडाच्या तयारीत आहे का ? असा सवाल निर्माण होत आहे. यातच अजित पवार यांचं या विषयावर असलेले मौन देखील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरते आहे.
यावर आता कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी देखील सूचक वक्तव्य केले आहे. चव्हाण म्हणाले की, कुठलाही भूकंप सांगून येत नाही. महाराष्ट्रातील संत महात्म्यांची पुण्याई भरपूर आहे. त्यामुळे महाराष्ट्रात असा राजकीय भूकंप येण्याची सुतराम शक्यता नाही. असं देखील ते पुढे म्हणाले आहेत. त्यामुळे चव्हाणांच्या या सूचक वक्तव्याने चर्चांना उधान आले आहे.
Ajit Pawar यांना पाठिंबा देण्यासाठी ‘हे’ आमदार मुंबईला रवाना…
दरम्यान अजित पवार यांच्याप्रमाणे अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सूरू झाल्या होत्या. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रे दरम्यान या चर्चांना उधान आले होते. कारण यावेळी चव्हाणंची नाराजी दिसून आली होती. तर काही ठिकाणी त्यांनी याच नाराजीमुळे ते गैरहजर राहिल्याचे बोलले जात होते.
मात्र, या सर्वावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खडखडीत मौन आहे. अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यांच्या सह्या घेण्यासाठी वैयक्तिकरित्या बोलावत असताना, ज्येष्ठ पवारांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.