Ajit Pawar यांना पाठिंबा देण्यासाठी ‘हे’ आमदार मुंबईला रवाना…

Ajit Pawar यांना पाठिंबा देण्यासाठी ‘हे’ आमदार मुंबईला रवाना…

NCP leader Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्या असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. यामुळे महाविकास आघाडीला डावलत येत्या काळात अजित पवार हे भाजपसोबत दिसणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे राष्ट्रवादीत अस्वस्थ आहे अशा चर्चा समोर आल्या आहेत. यातच भाजपचे नेतेमंडळी देखील कोणी आमच्या सोबत येणार असेल तर त्यांचे स्वागतच आहे, असे म्हणत एक प्रकारे या बातम्यांना हवा देत आहे. यामुळे अजित पवार पुन्हा एकदा बंडाच्या तयारीत आहे का ? असा सवाल निर्माण होत आहे. यातच अजित पवार यांचं या विषयावर असलेले मौन देखील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरते आहे.

मोठी बातमी : बंडासाठी अजित पवारांकडे 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र तयार?

यामध्ये आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या प्रयत्नांना त्यांच्या पक्षातील आमदारांच्या संमती सह्या मिळाल्याने वेग आला आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी संमतीच्या स्वाक्षऱ्या दिल्या आहेत. वेळ आल्यावर ही यादी राज्यपालांना सादर केली जाईल,अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे चिपळूनचे आमदार शेखर निकम हे अजित पवारांना भेटण्यासाठी मुंबईला रवाना झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभुमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

मात्र, या सर्वावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खडखडीत मौन आहे. अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यांच्या सह्या घेण्यासाठी वैयक्तिकरित्या बोलावत असताना, ज्येष्ठ पवारांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube