Download App

वंचितने महाविकास आघाडीत यावे…; पवार-आंबेडकरांच्या भेटीवर कॉंग्रेस नेत्याचं मोठे विधान

  • Written By: Last Updated:

Ashok Chavan : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची आज मुंबईत भेट झाली आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी आंबेडकर यांची शरद पवारांशी भेट घडवून आणली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडी (INDIA) आणि महाविकास आघाडीत येण्याची शक्यताही वर्तवली जाते. दरम्यान, यावर आता कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan)यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वंचितने महाविकास आघाडीत यावे, ही माझी वैयक्तिक इच्छा असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

श्रीलंकेनं नेदरलँड्सला नमवलं! 5 विकेट्सनं पराभव; लंकेनं उघडलं खातं… 

आज माध्यमांशी बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले की,आज मुंबईत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेली प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची भेट ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. महाविकास आघाडीची पुढची सकारात्मक पावले पडण्याच्या दृष्टीने हा एक शुभ संकेत आहे. माझी व्यक्तीगत इच्छा आहे की, प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी आणि महाविकास आघाडीने आगामी निवडणुकीमध्ये एकत्र आलं पाहिजे, असं चव्हाण म्हणाले.

चव्हाण म्हणाले की, आज भलेही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा आंबेडकरांच्या भाषेमध्ये कॉफी पिण्याच्या निमित्ताने एकत्र आल्याचे संकेत त्यांनी दिले. जे काही असेल ते सकारात्मक आहे. आगामी काळात यातून एक संवाद सुरू होईल. पुढील काळात वंचित आघाडीला महाविकास आघाडी सोबत घेण्याच्या दृष्टीने काही चांगली सकारात्मक पावले पडावीत, अशी माझी इच्छा असल्याचं सांगत चव्हाण यांनी या भेटीवर समाधान व्यक्त केलं.

येत्या वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी भाजपविरोधी पक्षांची युती करून इंडिया आघाडीची स्थापन केली. अनेक विरोधी पक्ष इंडिया आघाडीत सामील झाले. मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बुहजन आघाडीचा इंडियात समावेश झालेला नाही. दरम्यान, वंचित इंडिया आघाडीत येणार असल्याची चर्चा आहे. वंचितबाबत काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी भाष्य केलं होतं. आंबेडकरांना इंडिया आघाडीत घ्यावं हे माझं मत आहे, असं ते म्हणाले होते. त्यानंतर आज या दोघांची भेट झाली.

दरम्यान, आता अशोक चव्हाण यांनीही प्रकाश आंबेडकरांविषयी अनुकूलता दर्शवली. वंचितने आघाडीत यावं, अशी इच्छा त्यांना बोलून दाखवली. मात्र, कॉंग्रेस प्रकाश आंबेडकर इंडिया आणि महाविकास आघाडीत स्वीकारतील का, हाच प्रश्न आहे.

Tags

follow us