Download App

अर्थमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प मांडणार; निवडणुकांच्या तोंडावर मोठ्या घोषणांची शक्यता

अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे.

  • Written By: Last Updated:

Maharashtra Interim Budget 2024 :  महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरू झालं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर होणारं हे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. (Interim Budget ) लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्याने विरोधक उत्साहात आहेत. तर सत्ताधारी आता मोठ्या मोठ्या घोषण्या करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतय. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार या पंचवार्षिकमधाल शेवटचा (Budget 2024) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मोठ्या-मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर अपघात; छत कोसळल्याने सहाजण जखमी, वाहनांचं नुकसान

यंदाच्या अर्थसंकल्पात मराठा आरक्षण, अल्पसंख्याक कल्याण आणि शेतकरी, यांच्यासह मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तसंच, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, पेपरलीक घोटाळा, ओबीसी आरक्षण असे अनेक मुद्दे गाजल्याने महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

5 हजार रुपयांचा भत्ता Beed News : मराठा विरूद्ध ओबीसी वाद चिघळळा; मनोज जरांगे पाटलांच्या मूळगावी दगडफेक

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी भरीव तरतूद करू शकते. तसंच, महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1200 ते 1500 रुपये देण्याची शक्यता आहे. तसंच, राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी दरमहा 5 हजार रुपयांचा भत्ता देण्याची घोषणा केली जाऊ शकते.

महिला सक्षमीकर

अर्थमंत्री अजित पवार यांनी काल अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या घोषणाबद्दल माहिती दिली. राज्यातील आंगणवाडी सेविका व मदतनीसांची 14 हजार रिक्त पदे भरण्यात आली असून, इतर रिक्त पदं भरण्यासाठी काम सुरू आहे. कुपोषणाच्या समस्या रोखण्यासाठी राज्यात नागरी बाल विकास केंद्र सुरु करण्यात आली आहेत. महिला सक्षमीकरणासाठी दहा शहरातील पाच हजार महिलांना पिंक रिक्षा योजना राबवणार, विदर्भातील काही जिल्हे आणि पालघर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याच्याशी संलग्न असलेले 430 खाटांचे रुग्णालय उभारले जाणार आहेत.

follow us