Ajit Pawar Angry on Officer : राज्याच्या राजकारणात अजित पवार हे कुठल्याही पदावर असोत त्यांच्या वागण्या-बोलण्यात फारसा कधी बदल होत नाही. त्यांनी आपल्या बोलण्याची मोठी किंमतही मोजली आहे. (Ajit Pawar) मात्र, त्यांच्या बोलण्याला जो काही एक ग्रामिण लहेजा आहो तो कायम असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याचा प्रत्ययही कायम येत असतो. असाच एक प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. जीएसटी भवनच्या इमारतीचं उद्घाटन करायला आले असता पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना अजित पवारांना आपल्या ‘दादा स्टाईल’ने चांगलच झापलं आहे.
दोन वर्षात फक्त गद्दारांची प्रगती झाली; महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला, पैठणमधून आदित्य ठाकरेंचा घणाघात
व्हिडिओ व्हायरल
पुण्यातील जीएसटी भवनच्या इमारतीचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच, वडगावशेरी मतदारसंघातील तीनशे कोटींच्या विकास कामां भूमिपूजन देखील अजित पवारांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर त्यांनी ते तेथील पाहणी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी काही कामं व्यवस्थित केली नाही किंवा ती लवकर आवरण्यासाठी वरवर केली असल्याची बाब अजित पवारांच्या लक्षात आली. त्यांनी थेट त्या कामाच्या संबंधित अधिकाऱ्याला बोलवत त्यांची आपल्या शब्दांत कानउघडणी केली. याचा व्हिडिओही सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
Video : महायुतीत पुण्यात ठिणगी; राष्ट्रवादीचे आमदार टिंगरे यांच्यावर भाजपच्या मुळीक यांचा वार
काय घडलं?
अजित पवार इमारतीच्या उद्घाटनासाठी गाडीतून खाली उतरले. इमारतीकडे जाताना पहिल्याच पायरीला सिमेंट होते. ते सिमेंट व्यवस्थित साफ केलेलं नव्हतं. अजित पवारांनी संबधित अधिकाऱ्याला विचारलं हे असं का झालय? त्यावर अधिकाऱ्याने ते काढायचं राहिलं असं उत्तर दिलं. अधिकाऱ्याच्या या उत्तरानंतर अजित पवारांचा पारा चढला. ते म्हणाले, हे मला काढायला ठेवलं का? तुम्हाला माहित आहे ना मी बारीक बघतो. मग हे कशाला झक मारायला ठेवलं का? अशा शब्दांत त्यांनी आपला राग व्यक्त केला. तसंच, पुढे गेल्यानंतर इमारतीच्या आतील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ड्रेनेज चेंबर रस्त्याच्या मध्येच होते. ते पाहून अजित पवार पुन्हा एकदा चिडले आणि अशी छा चू गिरी करू नका असं म्हणाले.
पुण्यात जीएसटी भवनच्या इमारतीचं उद्घाटन कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या 'दादा स्टाईल'ने चांगलच झापलं. पहिल्याच पायरीला सिमेंट होतं. त्यावरून अजित पवार संतापले. #AjitPawar #AjitPawarAngryonOfficer #JSTOfficePune pic.twitter.com/i20s0WKjeR
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 26, 2024