दोन वर्षात फक्त गद्दारांची प्रगती झाली; महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला, पैठणमधून आदित्य ठाकरेंचा घणाघात

दोन वर्षात फक्त गद्दारांची प्रगती झाली; महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला, पैठणमधून आदित्य ठाकरेंचा घणाघात

Aditya Thackeray in Paithan : महाराष्ट्रात गद्दारी झाल्यानंतर खोके घेतलेल्यांपैकी कुणी वाईनची दुकानं टाकली, कुणी 72 व्या मजल्यावर घरं घेतली, कुणी डिफेंडर गाडी घेतली. (Aditya Thackeray) पण इथल्या एकाही तरुणासाठी नवीन रोजगार महाराष्ट्रात आलेला नाही. गेल्या दोन वर्षात फक्त गद्दारांची प्रगती झाली आहे, महाराष्ट्राची झालेली नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. ते पैठण येथील जाहीर सभेत बोलत होते.

Video : आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये; भाजप अन् शिवसेना ठाकरे गट आमने-सामने, तुफान राडा

लोकसभेत या मतदारसंघात आपला पराभव झाला असला तरी देशात वातावरण आपण जिंकल्यासारखं आहे. ज्या हुकुमशहांना वाटत होतं की ते चारशे पार जातील, एक्झिट पोल सांगत होते की चारशे पार जाणार त्यांना आपण 240 वर अडकवले आहे. महाराष्ट्र व उत्तर प्रदेशने दाखवलंय की इथे माज, हुकुमशाही, मस्ती चालत नाही. इथे फक्त जनतेचा आावाज चालतो, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

वाद पेटला ! ठाण्यात मनसेचा राडा; उद्धव ठाकरेंच्या गाडीवर बांगड्या, शेण फेकले

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आदित्य ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याला भाजपकडून विरोध करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरममधील रामा हॉटेलबाहेर भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, भाजपला आंदोलन करण्याची गरज होती का? माझ्या हातात पद आहे का? सरकार आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube