Attack on Uday Samant Car during campaign rally : लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha elections ) रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करत आहे. या दरम्यान आता महायुतीच्या प्रचाराच्या वेळी मंत्री उदय सामंत ( Uday Samant ) यांच्या ताब्यातील वाहनावर हल्ला झाला आहे. यवतमाळमध्ये ही प्रचार सभा घेण्यात आली. त्यावेळी सामंत यांच्या ताब्यातील वाहनावर दगड फेकण्यात आला.
कोट्यावधींचं सोनं, चांदी अन् हिरे… नारायण राणेंची संपत्ती आहे तरी किती?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या सभेला आले होते. ते देखील यावेळी उदय सामंत यांच्यासोबत होते. अज्ञात व्यक्तीने दगड घरकुल सामंत यांच्या वाहनावर पाहायला गेला. त्या हल्ल्यात कारची काच फुटली आहे. मात्र सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. तसेच हा हल्ला कशासाठी झाला? त्यामागे काय उद्देश होता. माहिती नाही. असाच हल्ला माझ्यावर पुण्यातही झाला होता. तसेच याचा पोलीस शोध घेत आहेत. अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
Ahmednagar : तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 56 कोटींचे अनुदान वर्ग; विखेंची माहिती
CM शिंंदेंचा मोठा डाव; उद्धव ठाकरेंचे ‘विश्वासू’ मिलींद नार्वेकरांना लोकसभेची ऑफर?
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कायम सावलीसारखे वावरणारे, राजकीय निर्णयात सहभागी असणारे त्यांचे खासगी सचिव मिलींद नार्वेकर यांनाच लोकसभा निवडणूक लढण्याची ऑफर शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती आहे. मिलींद नार्वेकरांना दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढण्याची ऑफर शिंदे गटाने दिल्याची माहिती आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाने विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे.