Kisan Kathore On Badlapur : बदलापुरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार (Badlapur Rape Case) केल्याची घटना घडली. या घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना 13 ऑगस्ट रोजी घडल्याचं सांगण्यात येत असून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप केला जातोयं. या घटनेविरोधात सबंध बदलापुरकरांनी रेल्वे स्थानकावर चक्काजाम आंदोलन केलंय. एकूणच या संपूर्ण प्रकरणावर भाजपचे आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) यांनी ही राजकीय स्टंटबाजी असून आंदोलक बदलापुरचे नसल्याचा दावा केलायं. एबीपी माझा या वृत्तसंस्थेने ही माहिती दिलीयं.
The Buckingham Murders: करीनाच्या ‘द बकिंघम मर्डर्स’चा टीझर प्रदर्शित, या अंदाजात दिसतेय बेबो
आमदार कथोरे म्हणाले, सकाळच्या सुमारास आंदोलन भरकटलं असून शाळा बाजूला राहिलीयं तर आंदोलक रेल्वेमध्ये घुसले आहेत. हे आंदोलक मंडळी बाहेरुन आलेली असून शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई केल्यानंतर वातावरण शांत झालंय. संस्थाचालकांचीही चौकशी सुरु आहे, शिक्षणाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. मात्र ही फक्त ठरवून केलेली राजकीय स्टंटबाजी असून बदलापुरकरांना आज वेठीस ठरण्यात आलं असल्याचं कथोरे यांनी म्हटलंय.
बदलापूर शाळेत चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; मुख्यमंत्री शिंदे अन् गृहमंत्री फडणवीस काय म्हणाले?
तसेच आंदोलकांनी शांतता राखावी, या प्रकरणात कोणीही राजकारण करु नये, तपासासाठीचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. लाडक्या बहीणीचं मानधन देऊ नये, न्याय द्या, असे बॅनर उल्हासनगर भागात लावण्यात आले आहेत, हे बाहेरुन आलेल्या मंडळींनी रात्रीत बॅनर तयार केले असल्याचा आरोप कथोरे यांनी केलायं.
नेमकं काय घडलं?
बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. येथील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत. बदलापूर बंदची हाक देण्यात आली असून नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे.
घटनेच्या तपासासाठी एसआटी स्थापन..
बदलापूरमधील घटना निंदनीय असून शाळा कर्मचाऱ्याचं कृत्य निंदनीय आहे. या घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, असाच राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाचा प्रयत्न आहे. घटना उघडकीस आल्यानंतर जी जी कारवाई केली पाहिजे. जी कारवाई झाली पाहिजे, तशीच कारवाई सुरु आहे. या केसच्या तपासासाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं असून विरोधकांच्या मनात केवळ राजकारण असून संवेदना बोथट झालेल विरोधक आहेत, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केलीयं.