मोठी बातमी, भाजप आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानासमोर गोळीबार; 1 जण जखमी

मोठी बातमी, भाजप आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानासमोर गोळीबार; 1 जण जखमी

MLA Kisan Kathore : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, बदलापूर (Badlapur) येथे भाजप आमदार किसन कथोरे (MLA Kisan Kathore) यांच्या निवासस्थानासमोर गोळीबाराची घटना समोर आली आहे.

माहितीनुसार, त्यांच्या घरासमोरील मुख्य रस्त्यावर गोळीबार झाला आहे. दोन गटांमध्ये झालेल्या वादातून ही गोळीबाराची घटना घडल्याची प्राथमिक तपासातून माहिती समोर आली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, बदलापूर गावातील बोराटपाडा मुरबाडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ही धक्कादायक घटना घडली आहे. याच मार्गावर आमदार किसन कथोरे यांच्या बंगला आहे.

भारतीय कर्णधार शुभमन गिलचा नवा कारनामा; मोडला किंग कोहलीचा ‘तो’ विक्रम 

दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात एक जण गंभीर झाला असल्याची देखील माहिती समोर आली आहे. या गोळीबारात अल्ताफ शेख नामक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर दुसरीकडे गोळीबार कोणी आणि का केला ? याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube