Download App

अहिल्यादेवींच्या नावाला साजेसं काम करा, तडजोड सहन करणार नाही; अजितदादांचा सरकारला इशारा

Ajit Pawar On Eknath shinde : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar Jayanti)यांच्या चौडी येथील शासकीय जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी बारामतीच्या मेडिकल कॉलेजला (Medical College of Baramati)अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा करण्यात आली. त्याविषयीचं नुसतं परिपत्रक काढून सत्ताधाऱ्यांनी मोठा तीर मारल्याचा आव आणला, पण मेडीकल कॉलेजमध्ये अहिल्यादेवींच्या नावाला साजेसं काम करा, त्यात कोणतीही तडजोड आम्ही बारामतीकर सहन करणार नसल्याचा इशारा यावेळी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. ते अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठान, बारामती आयोजित समाजभूषण व समाजरत्न आणि राजमाता अहिल्यादेवी पुरस्कार वितरण सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात बोलत होते. (baramati-ajit-pawar-on-cm-eknath-shinde-ahilyadevi-holkar-mediacal-college-name-eknath-shinde)

क्रिकेटनंतर युझवेंद्र चहलचे आणखी एका खेळात पर्दापण! ट्विट करत दिली माहिती

यावेळी अजित पवार म्हणाले की, बारामतीच्या अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठाणच्या माध्यमातून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा महोत्सव गेले अनेक वर्षांपासून नाना देवकाते या ठिकाणी साजरा करत आहेत. आपण सर्वजण त्याच्यात सहभागी होत असतो. कुठल्याही जातीचा, पंथाचा, नात्याचा, गोत्याचा विचार न करता आपण पुढे जात असतो.

आषाढीपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी घेतलं विठुरायाचे दर्शन, ‘वारकऱ्यांची जबाबदारी सरकारची’

बारामतीच्या मेडिकल कॉलेजला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शासकीय जयंतीच्या कार्यक्रमात अहिल्यादेवींचे नाव देण्याची घोषणा केली. त्यावरुन सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवार म्हणाले की, बारामतीच्या मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव दिल्याचा सर्वाधिक आनंद आम्हा बारामतीकरांना झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

आपण सर्वजण राजमाता अहिल्यादेवींच्या विचारावर चालतो. त्यांचा आदर्श आपण सर्वजण मानतो. आमच्या मनामध्ये कोणतीही खोट नाही. पण त्यानिमित्तानं आमचं एवढंच म्हणणं आहे की, हा निर्णय घाईघाईने घेण्यापेक्षा बारामतीकरांना सोबत घेऊन घ्यायचा होता, त्याचबरोबर राजमाता अहिल्यादेवींच्या नावासोबत बारामती मेडिकल कॉलेज असाही त्याच्यामध्ये उल्लेख असावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार असल्याचेही यावेळी अजित पवार म्हणाले. जसं सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ तसं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, बारामती मेडिकल कॉलेज असं ते असलं तर ते आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब ठरेल असंही पवार म्हणाले.

अहिल्यादेवींचं नाव कॉलेजला दिलं त्या नावाला साजेसं काम मेडिकल कॉलेजमध्ये झालं पाहिजे. नुसता नाव देऊन चालणार नाही, नाव दिलंच त्याबद्दल आनंद आहे. त्याबद्दल मनापासून अभिनंदन पण त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर आहेत का प्राध्यापक आहेत का, इतर स्टाफ आहे का औषधं आहेत का? मेडिकल कॉलेजच्या राहिलेल्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहता कामा नये, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाला साजेसं काम व्हावं त्यात कोणतीही तडजोड आम्ही बारामतीकर स्वीकारणार नसल्याचा इशारा यावेळी अजित पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Tags

follow us