घरात घुसून महिलेबरोबर….बारामतीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

Baramati-13 फेब्रुवारी 2026 ते 25 मे 2026 या कालावधीत आरोपी मासाळ याने फिर्यादी महिलेशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेतला.

Kishor Appasheb masal

Kishor Appasheb masal

पुणे : राज्यात महिलेवरील अत्याचारच्या घटना सातत्याने वाढत आहेत. राज्यात महिला असुरक्षित आहेत. अशीच महिला अत्याचाराची घटना बारामतीमध्ये घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकाने महिलाच्या घरात घुसून महिलेचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक किशोर अप्पासाहेब मासाळ (Kishor Masal) याच्याविरोधात बारामती पोलिस ठाण्या विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी बारामतीमधील एका 45 वर्षीय महिलेने फिर्याद नोंदविली आहे. (
(Baramati crime news case of molestation was registered against NCP nagarsevak in Baramati women complaint)

13 फेब्रुवारी 2026 ते 25 मे 2026 या कालावधीत आरोपी मासाळ याने फिर्यादी महिलेशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेतला. तिच्या राहत्या घरी अनधिकृत प्रवेश केला. तसेच वेळोवेळी अश्लील स्वरूपाच्या मागण्या करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Video : ममता बॅनर्जींचा भाचा अभिषेक बॅनर्जींवर हल्ला, अंडे फेकले कपडे फाटले चोर-चोरच्या घोषणा…

आरोपीने स्वतःच्या ओळखी व प्रभावाचा धाक दाखवत धमक्या दिल्या. तसेच तिचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी देत आर्थिक लाभ मिळवून देण्याची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


पुण्यातील विषारी मृत्यू तांडवाचं भिवंडी कनेक्शन; तुकाराम मुंढेंचा थेट प्रहार, ‘मिथेनॉल’चे घबाड जप्त

आरोपीने महिलेचा पाठलाग करून तिला मारहाण केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 253/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 332(c), 74, 75, 78, 115(2), 352 आणि 351(2)(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मासाळ हा बिनविरोध नगरसेवक

किशोर मासाळ हे बारामती नगरपालिकेवर बिनविरोध निवडून आलेला आहे. तो अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तर राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष आहे, अशी पदं त्याने आपल्या फेसबुकवर लिहिलेली आहेत.

Exit mobile version