Baramati Lok Sabha: बारामती लोकसभेच्या उमेदवारांचे चित्र अखेर आज स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे राज्याला आता नणंद-भावजय यांची राजकीय लढत बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे आजच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर लगेच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
मोठी बातमी : ‘तुतारी’ हाती घेताच निलेश लंकेंना नगरमधून उमेदवारी; पवार गटाची पहिली यादी जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. निलेश लंकेंना (Nilesh Lanke) अहमदनगरमधून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सुप्रिया सुळे (Supria Sule) यांची उमेदवारी बारामतीमधून जाहीर करण्यात आली आहे.भाजपने नगरमधून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्याविरोधात निलेश लंके यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देऊन विखेंविरोधात मैदानात उतरले आहेत.
NCP announces Sunetra Pawar as candidate from Baramati constituency for the upcoming Lok Sabha elections. Sunetra Pawar will contest against Supriya Sule who is the candidate for NCP (SCP)
— ANI (@ANI) March 30, 2024
शरद पवार गटाकडून पाच जणांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात सुनेत्रा पवार यांची बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तटकरे यांनी केवळ ही एकच उमेदवारी घोषित केली आहे.
पवारविरुद्ध पवार संघर्ष टोकाला !
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडे गेला आहे. अजित पवारांना पक्ष व घड्याळ चिन्ह मिळाले आहेत. तर शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. या पक्षाला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. यामध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार हे संघर्ष पाहिला जात आहे. दोन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी एकमेंकाना थेट आव्हाने देत आहे. परंतु आता ही लढाई थेट निवडणुकीच्या मैदानात आली आहे. तीन टर्म खासदार सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या आहेत. त्यात बारामतीचे राजकारण आणखी पेटणार आहे. त्यात पवारविरुद्ध पवार असा संघर्षच पाहिला मिळणार आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांचे सख्ये बंधू श्रीनिवास पवार व त्यांचे कुटुंब हे सुप्रिया सुळेंबरोबर आहे. त्यामुळे दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
विजय शिवतारे अजितदादांसाठी मैदानात
शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर शिवतारे यांनी अपक्ष लढविण्याचा निर्णय मागे घेतला. तसेच आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांना निवडून आणणार असे शिवतारे यांनी जाहीर केले आहे. एका अर्थाने शिवतारे हे आता अजित पवारांसाठी मैदानात उतरले आहेत.