Sharad Pawar On Pm Narendra Modi : ज्यांच्या हाती सत्ता त्यांच्याकडून मागील दहा वर्षांत जनतेची फसवणूक झाली असल्याचा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Loksabha) आज सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुण्यात आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या आश्वासनांचा दाखल देत जोरदार हल्लाबोल चढवला आहे. यावेळी सभेत महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते.
‘अरुण गवळीच्या लेकीला महापौर होईपर्यंत पाठिंबा’; निवडणुकीच्या धामधुमीत नार्वेकरांचं वक्तव्य
शरद पवार म्हणाले, ज्यांच्या हाती सत्ता त्यांच्याकडून जनतेची फसवणूक होत आहे. देशात महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार अशा अनेक गोष्टी आहेत. देशात 2014 साली मोदी सत्तेत आले. सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी 50 दिवसांतच पेट्रोलचे दर कमी करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी पेट्रोल 50 रुपये होतं. आज 3650 दिवस झाले आहेत. त्यावेळी 50 रुपये लिटर पेट्रोल होतं आज 106 रुपये झालं आहे. गॅसचा दर 410 रुपये होता तो कमी करणार सांगितलं होतं, पण आज 1060 रुपयांना गॅस झालायं. तरुणांना रोजगार देणार असं आश्वासन दिलं होतं पण देशातील अनेक तरुणांना नोकऱ्या नाहीत. आश्वासने द्यायची अन् कुटनिती करायची हे जर मोदींचं धोरण असेल तर त्यांना सत्ता द्यायची नाही हे धोरण आपल्याला घ्यावं लागणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
वसंत मोरेंना PM व्हायचंय, ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत; अमित ठाकरेंचा खोचक टोला
तसेच देशात भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. सत्तेचा दुरुपयोग काय असतो तो भाजपने दाखवला आहे. झारखंड राज्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या अधिक आहे. झारखंडमध्ये आदिवासी मुख्यमंत्री आहेत, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली म्हणून त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आहे. ते आज सहा महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर टीका केली त्यांनाही जेलमध्ये टाकलं त्यांच्या मंत्र्याना टाकलं
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या आमदारांनाही तुरुंगात टाकलं आहे. सत्ता लोकांच्या भल्यासाठी असते. लोकशाही जगवण्यासाठी असते. लोकशाही उध्वस्त करण्याचं काम होत असेल तर मोदींचा पराभव करणं गरजेचं असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.