‘अरुण गवळीच्या लेकीला महापौर होईपर्यंत पाठिंबा’; निवडणुकीच्या धामधुमीत नार्वेकरांचं वक्तव्य

‘अरुण गवळीच्या लेकीला महापौर होईपर्यंत पाठिंबा’; निवडणुकीच्या धामधुमीत नार्वेकरांचं वक्तव्य

Rahul Narwekar : मुंबईतील सगळ्याच मतदारसंघात अजून उमेदवार निश्चित झालेले नाहीत. मात्र तरीही इच्छुक उमेदवारांकडून आपलं तिकीट निश्चित करण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. तसेच आपल्या बाजूने निर्मिती करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. अखिल भारतीय सेनेच्या परिवारात आज एक नवीन सदस्य सामील झाला आहे असे गृहीत धरा. मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी तुमचा पाठिंबा मागत नाही तर माझ्या बहिणीला (गीता गवळी) मुंबईची महापौर होईपर्यंत पाठिंबा देईल, असे राहुल नार्वेकर म्हणाले. मु्ंबईतील भायखळा परसिरात अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राहुल नार्वेकरांनी हे वक्तव्य केले.

Underworld Don Arun Gawali ची मुदतपूर्व सुटका करा; नागपूर खंडपीठाचे निर्देश

कुख्यात गुन्हेगार अरुण गवळीची मोठी मुलगी गीता गवळीने सन 2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवला होता. या निवडणुकीत अभासेतर्फे एकमेव नगरसेविका गीता गवळी होत्या. यानंतर शिवसेना आणि भाजपात फूट पडली. दोन्ही पक्षांनी पालिकेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये गीता गवळींनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला होता.

दरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ( Underworld Don Arun Gawali ) याची मुदतपूर्व सुटका करा, असे निर्देश नागपूर खंडपीठाकडून (Nagpur Bench order) काही दिवसांपूर्वी देण्यात आले होते. शासनाच्या 2006 च्या निर्णयाच्या आधारावर कुख्यात डॉन अरुण गवळीने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. त्यावर नागपूर खंडपीठामध्ये सुनावली पार पडली. त्यावेळी खंडपीठाने हे निर्देश दिले होते. या निर्देशांवर उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला नागपूर खंडपीठाकडून चार आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे आता जेल प्रशासन अरुण गवळीच्या सुटकेबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Madha Loksabha : मोहिते पाटील अन् शरद पवारांची दिलजमाई; प्रविण गायकवाडांनी सांगितलं A To Z

दक्षिण मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाने खासदार अरविंद सावंत यांना पुन्हा तिकीट दिलं आहे. त्यांच्याविरोधात कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत महायुतीचं काहीच ठरलेलं नाही. इतकेच काय तर हा मतदारसंघ कुणाला द्यायचा याचाही निर्णय अजून झालेला नाही. अशा परिस्थितीत जर हा मतदारसंघ शिंदे गटाकडे गेला तर राज्यसभेचे खासदार मिलींद देवरा किंवा माजी नगरसेवक यशवंत जाधव यांचा पर्याय आहे. जर हा मतदारसंघ भाजपने मिळवला तर राहुल नार्वेकर किंवा मंत्री मंगलप्रभात लोढा यांना उमेदवारी मिळू शकते.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज