बारामती : अजित पवारांच्या बंडखोरीनंतर अनेकदा शरद पवार (Sharad Pawar) आणि अजितदादा कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांसाठी एका मंचावर आले पण त्यांनी एकमेकांशी संवाद साधणं टाळल्याचे चित्र पाहण्यास मिळाले होते. त्यानंतर आज (दि.2) बारामतीत नमो महारोजगार मेळाव्यात या दोन्ही नेत्यांमधील दुरावा अधिक वाढल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. बारामतीतील कार्यक्रमाच्या मंचावर अजितदादा आणि पवारांच्या मध्यभागी एकनाथ शिंदे आणि फडणवीस बसल्याचे पाहण्यास मिळाले. एवढेच नव्हे तर, शरद पवार संपूर्ण कार्यक्रमात अधून मधून मान वळवून अजितदादांकडे बघत होते. मात्र, अजितदादा (Ajit Pawar) एकतर शिंदेंशी बोलताना दिसले किंवा पवारांकडे न बघता शांत बसलेले दिसले. त्यामुळे या दोघांमधील दुरावा वाढतच चालल्याचं चित्र बारामतीकरांनी याची देही याची डोळा प्रत्यक्षात अनुभवले. (No Single Word From Ajit Pawar With Sharad Pawar In Baramati Program )
“अजितदादा तुमच्याच हातात चावी, आता बारामतीसाठी”… शरद पवारांसमोरच CM शिंदेंकडून कौतुक अन् आभारही…
पवारांसह सुप्रिया सुळेंशीही अबोला
येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वी बारामतीत झालेला आजचा कार्यक्रम एखप्रकारे महायुतीचं शक्तीप्रदर्शन दाखवणारं असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांनी शरद पवारांशिवाय खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही जोरदार टीका केली होती. त्यानंतर आज एकच मंचावर येऊनही अजितदादांनी सुप्रिया सुळेंशी अबोला धरल्याचे दिसून आले.
अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकमेकांच्या बाजूला उभे असलेले दिसले पण दोघांनीही एकमेकांकडे पाहणं आणि भेटणं टाळलं. सुप्रिया सुळे सर्वांना भेटल्या. विचारपूस केली. पण दादांची विचारपूस केली नाही. यापूर्वी असं चित्र अवघ्या बारामतीकरांनी कधीच पाहिलं नव्हतं त्यामुळे अनेकांनी आश्चर्य वाटले तर काही मतदारांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील हे मात्र नक्की. कार्यक्रमासाठी स्टेजवर आल्यावर सुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अन्य मान्यवरांनी नमस्कार यावेळी शिंदेंच्या बाजूला अजितदादा उभे होते. पण त्यांना बगल देत सुप्रिया सुळेंनी पुढे जात फडणवीसांना नमस्कार करत त्यांची विचारपूस केली पण अजितदादांशी दोव शब्दांचा संवाद करणं टाळलं.
LokSabha Election : साताऱ्यात उलथापालथ!; …तर उदयनराजे राष्ट्रवादीत जाणार?
निवडणुकांपूर्वी सुत्रेना पवार यांच्याशी संवाद
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार यांच्या लढत होईल असे बोलले जात आहे. मात्र, अद्याप यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. पण, त्याआधी आज सुप्रिया सुळेंनी भाऊ अजित पवारांशी दोन शब्द बोलण्याऐवजी सुनेत्रा पवार यांच्याशी मंचावर चर्चा केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये वेगळ्याच चर्चांनी जोर धरला होता.
‘ तरीही अजितदादांना गृहखातं देणार नाही’, फडणवीसांच्या बारामतीकरांसमोर कोपरखळ्या
लोकप्रतिनिधी नसतानाही सुनेत्रा पवार पहिल्या रांगेत
बारामतीत आयोजित नमो महारोजगार मेळाव्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठक व्यवस्थेतही सुनेत्रा पवार यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. लोकप्रतिनिधी नसतानादेखील सुनेत्रा पवार यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एरवी कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सुनेत्रा पवार नसतात. आजचा पहिल्याच शासकीय कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावत थेट पहिल्या रांगेत स्थान मिळवल्याने लोकसभेसाठी बारामतीमधून सुनेत्रा पवार लढणार असल्याचे संकेत यामुळे समोर आले आहे.