Bchhu kadu On MVA : आमदार बच्चू कडू यांनी काल मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेवर बोलताना काही महत्त्वाचे वक्तव्ये केले आहेत त्यांनी यावेळी म्हटलं की, महाविकास आघाडीची वज्रमुठ तुटेल हे सांगता येत नाही. तसेच त्यांनी यावेळी शरद पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंतांच्या भेटीवरही महत्त्वाची टीपण्णी केली आहे.
‘विरोधक आज सभा घेताता पण उद्या कोण कुठे जाईल सांगता येत नाही. कारण गेल्या 15 दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या चर्चा पाहता कधी पुन्हा वादळ येईल आणि महाविकास आघाडीची वज्रमुठ तुटेल हे सांगता येत नाही. सभेला मोठ्या प्रमाणात लोक आले. कारण आजकाल सभेला लोक येणं फार काही विशेष नाही. वाहनांची व्यवस्था असते. रस्ते चांगले झाले त्यामुळे लोक येतात.’
Uday Samant : शरद पवार राज्याचे ज्येष्ठ नेते, बारसू रिफायनरी प्रकरणात मध्यस्थी करावी
‘मात्र नेतेच राहणार नसतील कर काय उपयोग. गेल्या काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. लोकांनी त्यांना प्रतिसादही दिला. पण नेतेच गायब व्हायला लागले. त्यामुळे ही यात्रा कॉंग्रेस नेत्यांना प्रभावित करणारी ठरली हे का? हे ही महत्त्वाच आहे.’ अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी काल मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेवर बोलत होते.
‘पुन्हा वज्रमुठ सभा होणार नाही’, भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्युत्तर
पुढे बोलताना त्यांनी शरद पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंतांच्या भेटीवरही महत्त्वाची टीपण्णी केली आहे. ते म्हणाले की, ‘पवारांची भेट कशासाठी होते हे आणखी अवघ्या महाराष्ट्राने ओळखलेलं नाही. त्यामुळे या भेटीवर वाच्याता करणं योग्य नाही. पण पवारांची भेट होत आहे. म्हणजे एक तर राजकीय भूकंप तरी होईल किंवा मग केवळ बारसू प्रकल्पावर चर्चा होईल.’ असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याने असे देखील संकेत मिळत आहेत की, महाविकास आघाडीची वज्रमुठ तुटणार का? शरद पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंतांच्या भेटीनंतर राजकीय भूकंप होणार का?