Uday Samant : शरद पवार राज्याचे ज्येष्ठ नेते, बारसू रिफायनरी प्रकरणात मध्यस्थी करावी

Uday Samant : शरद पवार राज्याचे ज्येष्ठ नेते, बारसू रिफायनरी प्रकरणात मध्यस्थी करावी

Uday Samant on Barasu Refinery : गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरीविरोधात (Barasu Refinery) स्थानिकांचे आंदोलन सुरु आहे. स्थानिकांची बाजू समजून घेण्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात बैठक होणार आहे. आज बरसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्याचं बरोबर त्यांनी उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली आहे. यानंतर आता स्थानिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी शरद पवार यांची भेट घेणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सामंत यांनी दिली आहे.

उदय सामंत म्हणाले की आजच्या कार्यक्रमात प्रगती आहे. एक-दोन बोअरिंग वाढलेल्या आहेत. बारसू रिफायनरी आणि स्थानिकांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. उद्या दुपारी शरद पवार, मी आणि मुख्यमंत्री अशी आमची बैठक होणार आहे. स्थानिकांचे प्रश्न आणि लोकांवर झालेल्या कारवाई संदर्भात चर्चा करणार आहे. स्थानिकांच्या शिष्टमंडळाने देखील शरद पवार यांची भेट घेतली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करुनचं ह्या प्रकल्पसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.

मोठी कारवाई ! पुण्यात सव्वा दोन कोटींचे ड्रग्स जप्त, पोलिसांनी तिघे केले गजाआड

शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या प्रकल्पासंदर्भात पुढाकार घेतला असेल तर चांगले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. यासाठी उद्या 3.30 वाजता बैठक घेणार आहेत. जमलं तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक देखील या बैठकीला असतील असे उदय सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरीच्या बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरून स्थानिकांचा विरोध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. या प्रकणावरुन विरोधी पक्षांनी देखील स्थानिकांना पाठिंबा दिला आहे. आता यातून तोडगा काढण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली. याप्रश्नी उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube