मोठी कारवाई ! पुण्यात सव्वा दोन कोटींचे ड्रग्स जप्त, पोलिसांनी तिघे केले गजाआड

मोठी कारवाई ! पुण्यात सव्वा दोन कोटींचे ड्रग्स जप्त, पोलिसांनी तिघे केले गजाआड

Pune Crime : पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आज धडक कारवाई करत तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांचे मॅफे ड्रोन ड्रग्स (एमडी ड्रग्स) जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्सची किंमत दोन कोटी 21 लाख रुपयांच्या आसपास आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पुण्यात सध्या अमली पदार्थ विरोधी मोहिम सुरू आहे. त्याअंतर्गत माहिती मिळाली की काही जण एमडी हार्ड ड्रग्ज घेऊन येत आहेत. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी लागलीच हालचाली करत सापळा रचला. सापळा रचून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एक किलो 100 ग्रॅम इतके एमडी ड्रग्स हस्तगत केले आहे.

पुण्यात 75 हजार झाडांची कत्तल; पर्यावरण प्रेमींचे चिपको आंदोलन

आरोपी हे रतलाम येथून पुण्यात आले होते. या आरोपींची जी साखळी आहे ती आता तपासण्यात येणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील एक आरोपी हा एक महिन्यापासून शहरात वास्तव्यास होता. त्याच्याकडून आधिक माहिती घेण्यात येत असून त्यानुसार तपास केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय तस्करीच्या माध्यमातून ड्रग्स आपल्याकडे येते.  त्याचा वेळोवेळी तपासही केला जातो. या चार महिन्यात कोकेन, गांजा, ब्राउन शुगर यांसारखे अंमली पदार्थ जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, पुण्यात आज संगीतकार ए. आर. रहमान यांचा लाईव्ह कॉन्सर्ट देखील पडत आहे. लाईव्ह कॉन्सर्ट च्या ठिकाणी तरुण तरुणींचा मोठा सहभाग असतो. याआधी देखील आशा मोठ्या कार्यक्रमांच्या ठिकाणी पोलिसांना अंमली पदार्थ सापडले होते. त्यामुळे पोलीस आता या बाजूनेही तपास करणार असल्याचे सांगण्यात आले.

Cm Eknath Shinde : पोलिसांकडून लाठीचार्ज झाला नाही, राजकारणासाठी राजकारण करु नका…

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube