पुण्यात 75 हजार झाडांची कत्तल; पर्यावरण प्रेमींचे चिपको आंदोलन

पुण्यात 75 हजार झाडांची कत्तल; पर्यावरण प्रेमींचे चिपको आंदोलन

Pune Chipko Protest : पुण्यातील मुळा-मुठा नदी (Mula-Mutha River) सुधार प्रकल्पासाठी नदी परिसरातील झाडं तोडण्यात येणार आहेत. यामध्ये 75 हजार झाडांची कत्तल केली जाणार आहे. या विरोधात पुण्यातील (Pune News) पर्यावरण प्रेमी एकवटले होते. यावेळी पर्यावरण प्रेमींनी प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत चिपको आंदोलन केले.

यावेळी नदी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, आरएफडी हटाव, सदोष आरएफडी राबवणारांचे करायचे काय, झाडे लावा झाडे जगवा, आम्ही निसर्ग सेवक, यांसारख्या विविध घोषणा देण्यात आल्या. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यांवर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सुंदरलाल बहुगुणा यांनी केलेल्या चिपको आंदोलनाची पुनरावृत्ती करण्यात आली. पर्यावरण प्रेमी सुधार प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रॅली काढली. तसेच चिपको आंदोलन केले. या रॅली रॅलीमध्ये काही राजकीय पक्ष नेत्यांनी देखील सहभाग घेतला होता.

‘भाकरी फिरवायला काळ, वेळ, वय अन् ताकद लागते’; राणेंचा पवारांना टोला

पुण्यातील हजारोंच्या संख्येने पर्यावरण प्रेमी यामध्ये सहभागी झाले होते. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास संभाजी उद्यान येथून ही रॅली सुरू झाली झाली. जंगली महाराज रस्त्यावरील पादचारी मार्गाने ती नदीपात्र मार्गे खिल्लारे वस्तीपर्यंत आली. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या नियोजित नदी सुधार प्रकल्पाला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला. नदी सुधार प्रकल्पामुळे नदीपात्रातील अनेक झाडे तुटणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे यामुळे पर्यावरण प्रेमींनी ही रॅली काढली असल्याने सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube