Beed Loksabha : बीड लोकसभेसाठी (Beed Loksabha) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar Group) गटाकडून शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे (Jyoti Mete) यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलीयं. या भेटीदरम्यान, राजकीय चर्चा झाली असल्याची माहिती समोर आलीयं. या भेटीनंतर आपण बीड लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं ज्योती मेटे यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आता बीडमधून महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या ज्योती मेटेचं उमेदवार असणार असल्याचं बोललं जात आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 25 रिक्त जागांसाठी भरती, महिन्याला 30 हजार रुपये पगार
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ज्योती मेटे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ज्योती मेटे यांनी बीड लोकसभेबाबत सुरु असलेलं कन्फूजन क्लिअर करुन टाकलं आहे. शिवसंग्रामच्या माध्यमातून विनायक मेटे यांचा वारसा चालवण्यासाठी आणि समाजातील पोकळी भरुन काढण्यासाठी आपण लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं मेटेंनी सांगितलं आहे. तसेच शरद पवारांसोबतही आम्ही आमच्या निर्णयाबाबत चर्चा केली असून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या यादीत माझं नाव टाकायचं की नाही, हा सर्वस्वी राष्ट्रवादीचा निर्णय असल्याचं ज्योती मेटे यांनी स्पष्ट केलं आहे.
OnePlus Nord CE4 भारतात लॉन्च! मिळणार जबरदस्त फीचर्ससह पावरफुल बॅटरी; खर्च होणार फक्त ‘इतके’ पैसे
बीड लोकसभेत पहिल्यांदाच जनतेकडून उमेदवार ठरवण्यात आला आहे. विविध जातीधर्माच्या लोकांकडून मी लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह केला जात आहे. त्यानंतर आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. बीड लोकसभेसाठी शरद पवारांकडून विचारणा झाली. त्याबाबत आमची शरद पवारांसोबत सकारात्मक चर्चा सुरु असून उमेदवारी जाहीर झाली नाही तर शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करुन पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही ज्योती मेटे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
उमेदवारीबाबत शरद पवारांसोबत सकारात्मक चर्चा सुरु असून त्यांनी त्यावर निर्णय घेऊन सांगावं, आम्ही निर्णयाची प्रतिक्षा करत आहोत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या चिन्हावर अथवा समर्थन घेऊनही लढणार आहोत. बीड लोकसभा निवडणुकीत ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळणार नाही कारण लोकप्रतिनिधी जातीधर्माचं प्रतिनिधीत्व करणारा असतो, त्यामुळे असं काही होणार नाही. जातीच्या आधारावर मतांचं ध्रुवीकरण होणार नसल्याचंही ज्योती मेटे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.