Download App

Beed Politics : पंकजांविरोधात महायुतीनेच काम केलं, खांडेंच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?

महायुतीमधील घटक पक्षांनी पंकजा मुंडेंविरुध्द काम केल्याचं बोलल्या जात होतं. आता शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या ऑडिओ क्लीप व्हायरल झाली.

  • Written By: Last Updated:

Pankaja Munde : लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला. या निवडणुकीत भाजपच्या (BJP) अनेक मातब्बर नेत्यांचा पराभव झाला. बीडमध्ये मोठी ताकत असलेल्या पंकजा मुंडेंनाही (Pankaja Munde) 6 हजार मतांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. राज्यात मराठा आणि ओबीसी वाद पेटल्यानंच महायुतीमधील काही घटक पक्षांनी पंकजा मुंडेंविरुध्द काम केल्याचं बोलल्या जात होतं. आता शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानं महायुतीने पंकजांच्या विरोधात काम केल्याचं उघड झालं.

बीडमध्ये खळबळ! शिवसेना जिल्हाप्रमुखांची ऑडिओ क्लिप व्हायरल; म्हणाले, पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना… 

बीडमधील निवडणुक मराठा विरुध्द ओबीसी अशा जातीय संघर्षातून गेली. निवडणुकी नंतरही या लोकसभा मतदारसंघात हा जातीय तेढ अद्यापही दिसत आहे. अशातच शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. निवडणुक काळात खांडे यांच्यासोबत एका राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची चर्चा सुरू  असतांना बंजरंग सोनवणे यांना कशी मदत करायची, हे तो कार्यकर्ता खांडे यांना सांगत आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.

 

Kalki 2898 AD मध्ये दिशा-प्रभासला एकत्र पाहण्यास उत्सुक; बीटीएस फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल 

सोनवणेंसाठी लावली फिल्डिंग…
तर दुसरी ऑडिओ क्लिप मतमोजणीनंतरची आहे. या क्लिपमध्ये  म्हाळसा जवळा या आपल्या मूळ गावातून पंकजा मुंडेंना मुद्दामहून लीड दिला. कारण ओबीसी मतांचा आपल्याला फायदा होऊ शकतो, हे सांगत बीड विधानसभा मतदारसंघातील सर्वच बूथवर बजरंग सोनवणे यांच्यासाठी आपण फिल्डिंग लावल्याचं खांडे सांगत आहे.

दरम्यान, ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कुंडलिक खांडे यांच्यावर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे. सध्या कुंडलिक खांडे यांचा फोन बंद असून तो माझा आवाज नाही, असं खांडे यांच्याकडून सांगितलं जात आहे.

follow us

वेब स्टोरीज