Download App

भगतसिंग कोश्यारींचे दावे राजकीयदृष्ट्या प्रेरित; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

मुंबई : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात राज्यपालनियुक्त १२ आमदारांचा (Governor appointed 12 MLAs) प्रश्न वेगवेगळ्या कारणामुळे कायम चर्चेत राहिला. महाविकास आघाडी सरकारने १२ आमदारांच्या नावाची यादी देऊनही त्या यादीला तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मान्यता दिली नव्हती. यावरच बोलताना कोश्यारी यांनी मला उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त करण्यासाठी पत्रात धमकी दिली होती, असा दावा केला आहे. दरम्यान, कोश्यारी यांच्या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या दाव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी मोठं वक्तव्य केलं. कोश्यारी यांच्या वक्तव्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. त्यांचे वक्तव्य राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे टीका तपासे यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधानपरिषदेच्या 12 आमदारांची नियुक्ती मी जाता-जाता देखील करणार नव्हतो, कारण, त्यावेळीचे मुख्यमंत्री याबाबत पत्र लिहून राज्यपालांना अधिकार नसल्याचे सांगतात. पंधरा दिवसांच्या आत 12 आमदारांच्या नियुक्ती यादीवर सही करण्याची धमकी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचा गौप्यस्फोट कोश्यारी यांनी केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला. यावर महेश तपासे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यपांलांनी केलेल्या दाव्यावर बोलतांना तपासे यांनी सांगितले की, राज्यपालांच्या बोलण्यात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. त्यामुळे राज्यपालांचे वक्तव्य फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांनी केलेलं वक्तव्य हे राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याची टीका तपासे यांनी केली आहे.

तपासे यांनी सांगितले की, वास्तविक राज्यपाल पदाची जबाबदारी स्वीकारल्यावर भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करणे, राज्य शासनास वेळोवेळी मार्गदर्शन करणे अशा अनेक गोष्टी भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून अपेक्षित होत्या. मात्र, कोश्यारी यांनी या सगळ्या कर्तव्याला बगल दिली. अनेकदा राज्यपाल घटनाबाह्य वागले. सरकार स्थापनेचे निमंत्रण न देताच एकनाथ संभाजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला, याचा खुलासा आरटीआयमधून झालेला आहे असेही महेश तपासे म्हणाले.

‘आता आम्हाला शिवसेना म्हणा’, शिंदे गटाकडून पत्रक प्रसिद्ध

दरम्यान, अनेक वक्तव्यांवर स्वतःचे मत मांडणाऱ्या भगतसिंग कोश्यारी यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिले नसल्याचे आता आरटीआयच्या माहितीतून समोर आले आहे. यावरही आपले मत कोश्यारी यांनी मांडायला हवे, असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे. तपासे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार पायउतार होताच शिंदे -फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी दिलेले पत्र अखेर कुठे आहे, याचे उत्तर भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 

 

Tags

follow us