Download App

तटकरे-गोगावलेंमुळे महायुती फुटणार? कारण आहे ‘नॅपकीन वॉर’

Bharat Gogawale Vs Sunil Tatkare: Bharat Gogawale Vs Sunil Tatkare: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये भडका उडालाय.

  • Written By: Last Updated:

Bharat Gogawale Vs Sunil Tatkare: राष्ट्रवादीचे नेते व रायगडचे (Raigad) खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) व एकनाथ शिंदेंचे शिलेदार, मंत्री भरतशेठ गोगावले (Bharat Gogawale) यांच्यामधील राजकीय युद्धाने आता भडका घेतलाय. हे सर्व रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू आहे. पालकमंत्रिपद स्थगित केल्यानंतर त्यावर अजूनही महायुतीला तोडगा काढता आलेला नाही. पण दोन्ही गटाचे नेते व आमदार एकमेंकांना खुले चॅलेंज देतायत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये भडका उडालाय. त्यामुळे रायगडमध्ये तरी महायुती स्थानिक स्वराज्य निवडणुकीत फुटणार अशीच परिस्थिती निर्माण झालीय. गेल्या आठवड्यात काय राजकारण घडतंय. त्याच काय परिणाम होईल हेच पाहुया…


पालकमंत्रिपदावरून वाद चिघळलेला

रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि शिंदे गटाचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले हे एकमेंकांना कायमच पाण्यात पाहत आलेत. महायुती झाल्यानंतर तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे यांना महिला व बालविकास खाते मिळाले आणि पालकमंत्रिपदही रायगडचेच मिळाले. पण कोट शिवून मंत्रिपदाच्या रांगेत उभे राहिलेले भरतशेठ गोगावले यांना मंत्रिपद मिळू शकले नाही आणि पालकमंत्रिपदाचे स्वप्न ही पूर्ण होऊ शकले नाहीत. तेव्हा ते शांत राहिले. त्यानंतर आताच्या नव्या सरकारमध्ये ते आणि आदिती तटकरे हे दोघे कॅबिनेटमंत्री झाले. आदिती तटकरे यांना हेविवेट महिला व बालकल्याण खाते मिळाले. तर गोगावले यांना काही कमी महत्त्वाचे खाते रोजगार हमी हे खाते मिळाले. रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेचाच पालकमंत्री व्हावा, यासाठी सेनेचे आमदार हे प्रचंड आक्रमक होते. परंतु मंत्रिपदानंतर दोन महिन्यांनी पालकमंत्रिपदाची यादी आली आणि पुन्हा आदिती तटकरे याच जिल्ह्याच्या बॉस झाल्या. त्यामुळे शिवसेनेचे आमदार संतापले. त्यांनी थेट रायगडमध्ये आंदोलन सुरू केले. त्यानंतर दोनच दिवसांत रायगडचे पालकमंत्रिपदाला स्थगिती मिळाली. त्यानंतर आता तीन महिन्यानंतर यावर तोडगा निघालेला नाही.

‘उद्धव साहेबांना शरद पवार अन् कॉंग्रेसच्या मांडीवर बसवलं’, मंत्री गिरीश महाजनांचा संजय राऊतांवर घणाघात


एकमेंकावर कुरघोड्या आणि टॉवेल मिमिक्री

पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नसताना सुनील तटकरे, भरत गोगावले यांच्यामधील राजकीय वाद आणखी चिघळलाय. आता ते दोघे एकमेंकाना थेट अंगावर घेतायत. महाड येथील राष्ट्रवादीच्या सभेत खासदार सुनील तटकरे मंत्री भरत गोगावले यांना थेट आव्हान दिलंय. इतकेच नाही तर गोगावले यांना विधानसभेला घेरणाऱ्या स्नेहल जगताप यांना तटकरे यांनी राष्ट्रवादीत घेतले. गोगावले यांच्याविरुद्ध जगताप यांना महाड मतदारसंघातून विधानसभेत उतरवण्याचे संकेत दिलेत. तर गोगावले यांची नॅपकीन मिमिक्री करून दाखविले.


चलनातून 500 रुपयांच्या नोट बंद होणार? PM मोदींच्या निकटवर्तीयाची जाहीर सभेत मागणी अन्..

गोगावले यांचे चोख प्रत्युत्तर
यावर गोगावले यांनी तब्बल पंधरा दिवसानंतर सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तेही आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात. त्यांनी नॅपकीन विषयावरून त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी नॅपकीन ज्या पद्धतीने खांद्यावर घेतली. तशी नॅपकीन वेटर खांद्यावर घेतो, असं म्हणत प्रत्युत्तर दिलंय. तुम्ही टीका करा आम्ही त्याला भीक घालत नाही, असा इशाराचा गोगावले यांनी दिलाय. बरं केवळ गोगावले नाहीत. महेंद्र थोरवे व महेंद्र दळवी हेही तटकरेंवर थेट हल्ला करतायत. तटकरे यांनी आमचा पराभव करण्याचा प्रयत्न केला, असा दोघांचा आरोप आहे.

महेंद्र थोरवेंनी तटकरेंना थेट चिटर म्हटलंय
एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून आपण सुनील तटकरे यांना निवडून आणले. परंतु निवडून आल्यावर त्यांनी आपला रंग दाखवलाय. आता जिल्हा परिषद , पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका आपण महायुती म्हणून लढणार आहोत. पण या युतीत सुनील तटकरे किंवा राष्ट्रवादी नसेल, असा स्पष्ट इशाराच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिला. तर तटकरे यांचा चिटर फॅमेली असा उल्लेख केलाय.

रायगडमध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेमधील राजकीय वाद विकोपाला गेलाय. त्याला किनार ही पालकमंत्रीपदाची आहे. त्यामुळे महायुतीतील मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी लगेच तोडगा काढला पाहिजे. एक तर पालकमंत्रीपद काही वर्षांसाठी दोघांमध्ये वाटून देणे किंवा या दोघाव्यतिरिक्त तिसऱ्याच व्यक्तीकडे पालकमंत्रीपद द्यावेत, असा राजकीय पर्याय आहेत. तर रायगडमध्ये महायुती अभेद्य राहू शकते. नाहीतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्याचा फटका स्वतःलाच बसू शकतो.

follow us