Bhaskar Jadhav : भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे ठाकरे गटात नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहे. त्यानंतर शिंदे गटाचे नेते भरत गोगावलेंनी (Bharat Gogavale) जाधव यांनी खुली ऑफर दिली होती. जाधव यांची तिकडे घुसमट होत असले तर त्यांनी शिवसेनेत यावं, असं गोगावले म्हणाले होते. दरम्यान, या सर्व चर्चांवर आता जाधव यांनी भाष्य केलं.
भास्कर जाधव हे चिपुळून येथे आज त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, शिवसेना फुटायच्या आधी राज्यसभेसाठी 20 तारखेला मतदान झालं. 21 तारखेला आमदार सुरतला गेले. त्याच क्षणी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. तुम्ही ताबडतोब कार्यालयात या, असे ते म्हणाले. वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती.त्या बैठकीला 11 खासदार उपस्थित होते. 17 ते 18 आमदार वगळता सर्व आमदार तेथे उपस्थित होते. त्यावेळी तिकडे गेलेले काही आमदारही उपस्थित होते. त्यावेळी अनेक आमदार भाजपसोबत जाऊ, असे सांगत होते. पण मी तिथे उद्धव ठाकरेंना सांगितले की, तुम्ही पक्षप्रमुख आहात, कोणता निर्णय घ्यायचा हे सांगणारा मी कोण? तुम्ही कुठेही जा, मात्र जर तुम्ही भाजपसोबत गेलात तर भास्कर जाधव तुमच्यासोबत राहणार नाहीत, असं जाधव म्हणाले.
Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापटचे घायाळ करणारे फोटो
मी मंत्रीपदासाठी लढत नाही…
भाजपसोबत गेल्यास भास्कर जाधव तुमच्यासोबत राहणार नाहीत. हे मी त्याला त्या बैठकीत सर्वांसमोर सांगितले. तेव्हा उद्धव ठाकरे मला म्हणाले होते की सगळे निघून गेले तरी चालेल, आपण राहू आणि भाजपच्या विरोधात लढू… आज मी मंत्रीपदासाठी लढत नाही, माझ्या पक्षप्रमुखांना दिलेल्या वचनासाठी लढत आहे, असेही त्या म्हणाल्या.
भाजपविरोधात एक शब्दही उच्चारला का?
जाधव यांनीही ठाकरेंविरोधात नाराजी व्यक्त केली. शिवसेना फुटली तेव्हा माझा गटनेतेपदावर दावा होता, पण त्यावेळी मला गटनेता करण्यात आले नाही. मी राष्ट्रवादी असताना मंत्री होतो, पण शिवसेनेत आलो तेव्हा ज्येष्ठ असूनही मला मंत्रीपद दिले गेले नाही. पण ज्यांना उद्धवसाहेबांनी मंत्रिपद दिलं, त्यांनी कधी भाजपविरोधात एक शब्दही उच्चारला का? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.
विक्रांतचे भाषण ऐकून जाधवांना अश्रू अनावर
यावेळी बोलताना विक्रांत जाधव यांनी वडिलांची बाजू मांडली. भास्कर जाधव उद्धव साहेबांना सोडणार नाहीत. ते कधीही विश्वासघात करणार नाहीत. कारण पाठ दाखवून पळणं हे आमच्या रक्तात नाही, असं ते विक्रांत म्हणाले. त्यावेळी भास्कर जाधव यांना अश्रू अनावर झाले. भास्कर जाधव म्हणाले, विक्रांतचं भाषण ऐकून डोळ्यात पाणी आलं. मी कधीही व्यक्तीगत पातळीवर जाऊन टीका केली नाही.माझ्या भाषेत कायत सभ्यता राहिली. विक्रांत तू ही प्रथा कायम ठेवली. त्याबद्दल तुझं जाहीर कौतूक करतो.