Download App

ऐन विधानसभेपूर्वी भाजपला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची कॉंग्रेसमध्ये घरवापसी होणार!

  • Written By: Last Updated:

Bhaskarrao Patil Khatgaonkar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर नांदेड (Nanded) जिल्ह्यात पुन्हा पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. अनेकांनी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे दाजी तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर (Bhaskarrao Patil Khatgaonkar) यांनीही भाजपची साथ सोडण्याचा निश्चय केला आहे. लवकरच ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

खासदार डॉ. शिवाजी काळगेंना मोठा दिलासा, जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप घेणाऱ्या याचिका फेटाळल्या… 

2021 च्या देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या आधी, भास्करराव पाटील खतगावकर यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या घरवापसीमुळे देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भापजने अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवले, पण खतगावकरांच्या पदरात काही पडलं नाही, त्यामुळं त्यांनी कॉंग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

बाबासाहेबांना धोका देणारे आरक्षणाला कधीही धोका देऊ शकतात; मुख्यमंत्री शिंदेंची खोचक टीका 

येत्या 15 सप्टेंबर रोजी ते मुंबईतील काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आहेत. त्यांच्यासोबत दोन माजी आमदार आणि खतगावकर यांच्या सूनबाई देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खतगावकर यांच्या या निर्णयाचा भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

खतगावकर यांच्यासोबत त्यांच्या सून डॉ. मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे यांचाही कॉंग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील एक गट फुटल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

सुनाबाईंची विधानसभेची वाट मोकळी…

डॉ.मीनल खतगावकर या माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सून आहेत. लोकसभेसाठी त्या भाजपकडून इच्छुक होत्या. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. विधानपरिषदेतही संधी न मिळाल्याने त्यांनी नायगाव मतदारसंघातून तयारी सुरू केली.

 

 

follow us