बाबासाहेबांना धोका देणारे आरक्षणाला कधीही धोका देऊ शकतात; मुख्यमंत्री शिंदेंची खोचक टीका
Cm Eknath Shinde On Rahul Gandhi : काँग्रेसने बाबासाहेबांना धोका दिलायं, दोनवेळा पराभूत केलंय, जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणालाही धोका देऊ शकतात, अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी काँग्रेसवर केलीयं. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधान केलंय. या विधानावरुन सत्ताधाऱ्यांकडून राहुल गांंधींना (Rahul Gandhi) फैलावर घेतलं जात आहे.
बारामतीतून कोणाला संधी? पुढील 8 दिवसांत क्लिअर होणार, सुळेंनी सांगितलं…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना धोका दिलायं, त्यांना दोनवेळा पराभूत केलंय, जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणालाही देऊ शकतात. काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा समोर आला आहे, काँग्रेस हे जळतं घर आहे, असं बाबासाहेब सांगायचे, बाबासाहेबांनी काँग्रेसचा अनुभव घेतला, असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीयं.
Video : शिमल्यात मशिदीवरून सुरू असलेला वाद चिघळला; पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज
तसेच देशात आरक्षण कायम राखण्यासाठी महायुतीसह एनडीए सरकार आरक्षणाच्या पाठीशी आहे. आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याच्याविरोधात आम्ही भूमिका घेऊ. लोकसभेत याच लोकांनी फेक नरेटिव्ह पसरवून संविधान, आरक्षण रद्द करणार हे सांगितलं होतं, तेच आता असं बोलतात त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आलायं याचा निषेध आणि निंदा करीत असून आरक्षणाला जे हात लावतील त्यांच्याविरोधात महायुती अन् केंद्र सरकार उभं ठाकणार असल्याचा शब्द मुख्यमंत्री शिंदेंनी दिलायं.
RBI : ॲक्सिस अन् एचडीएफसी बँकेने नियमांचं केलं उल्लंघन; RBI’ने ठोठावला 3 कोटी रुपयांचा दंड
विरोधकांकडून काय अपेक्षा करायची…
विरोधकांकडून काय अपेक्षा करायची प्रत्येकवेळी विदेशात आपल्या देशाची, जनतेची बदनामी करणए हीच त्यांची कायम भूमिका राहिली आहे. आता आरक्षणविरोधातला त्यांचा चेहरा समोर आला आहे. जे पोटात होतं ते ओठात आलं आहे. अनेकदा राहुल गांधींकडून देशाची बदनामी करणं आणि इतर देशाची वाह-वाह करणे, ही कोणती राष्ट्रभक्ती कोणतं प्रेम आहे, असा खडा सवाल मुख्यमंत्री शिंदेंनी केलायं.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं काँग्रेस नेते राहुल गांधी काल एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यांच्या विधानावर त्यांच्या विरोधकांकडून टीका केली जात आहे.