Download App

उद्धव ठाकरेंना नात्यांचे महत्त्व कळत नाही; ठाकरेंच्या टीकेवर भावना गवळींचं प्रत्युत्तर

  • Written By: Last Updated:

Bhavana Gawali on Uddhav Thackeray : काल उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची हिंगोलीत सभा झाली. या सभेत त्यांनी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali)यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान मोदींना भावना गवळींनी मागची वर्षी राखी बांधली होती. त्यावरूनच ठाकरेंनी भावना गवळींवर लक्ष्य केलं. पंतप्रधानांना राखी बांधली आणि ईडी थांबली, असं म्हणत त्यांनी भावना गवळींवर निशाणा साधला. त्याला आता भावना गवळींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंना नात्यांचे महत्त्व कळत नाही, अशी टीका गवळी यांनी केली.

आज भावना गवळींनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना ठाकरेंनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, उद्धल ठाकरे यांनी भावा-बहिनीच्या पवित्र नात्यावर वक्तव्य केलं. त्यांना नातं कधी टीकवता आलं नाही. म्हणून ते सतत पवित्र बंधनांवर बोलत असतात. कदाचित उद्धव ठाकरेंना नात्याचं महत्वं कळत नसेल. नाहीतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भाडणं कधीच संपलं असतं, असा खोचक टोला भावना गवळींनी लगावला.

ब्रिटनमध्ये ट्रॅफिक कंट्रोलमध्ये बिघाड; दुर्घटना टळली, AIR Traffic Control कसं काम करतं? 

त्या म्हणाल्या, राज ठाकरे, उद्धव ठाकरेंमधील वाद मिटला असता, मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यावर निर्णय घेतला नाही. भापज सोबत शिवसेनेची युती होती. मात्र, तेव्हाही त्यांनी काही ठोस निर्णय घेतला नाही. फडणवीसांबरोबर उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली, असं भावना गवळी म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, ठाकरेंनी कधीही कुणाला चांगली वागणूक दिली नाही. 40 आमदार आणि 13 खासदार सोडून का गेले? याचं चिंतन ठाकरेंनी केलं नाही.

ठाकरे काय म्हणाले होते?
हिंगोलीतील सभेत बोलतांना ठाकरे म्हणाले होते की, मागच्या वर्षीचं रक्षाबंधन तुम्हाला आठवतं का? पंतप्रधान मोदींना राखी बांधतांनाचा एकच फोटो आला होता. पंतप्रधानाना राखी बांधण्यात आली आणि ईडीची चौकशी थांबली, अशा शब्दात त्यांनी भावना गवळींवर टीका केली होती.

Tags

follow us