Bhushan SinghRaje Holkar Will Joing Sharad Pawar Party : पक्ष फुटल्यानंतरही शरद पवार (Sharad Pawar) यांनी गेल्या काही दिवसांपासून बेरजेच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. अलीकडे अनेक बडे नेते त्यांच्या पक्षात दाखल झालेत. नुकतेच माढ्याचे मातब्बर नेते धैर्यशील मोहिते पाटलांनी (Dhairyashil Mohite) शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर आता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे गजेंद्रसिंहराजे होळकर (Bhushan SinghRaje Holkar) हेही शरद पवार गटात दाखल होणार आहेत.
40 वर्षानंतही परकं मानतात, मग तळपायाची आग मस्तकात जाणार…; अजित पवार संतापले
शरद पवार यांनी आपल्या राजकीय अनुभव पणाला लावत महायुतीचा बंदोबस्त करण्याची तयारी केली आहे. आता पवारांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशजांना पक्षात आणले आहे. भूषणसिंहराजे गजेंद्रसिंहराजे होळकर हे उद्या (ता. 18) राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षत प्रवेश करणार आहेत. सकाळी 11 हा पक्षप्रवेश होणार आहे. शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार महाराष्ट्र ‘प्रदेश उपाध्यक्ष’ पदी निवड करण्यात येत आहे
उद्या महाघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रविंद्र धंगेकर हे उद्या लोकसभेसाठी अर्ज भरणार आहेत तिथेच हा प्रवेश होणार आहे. भूषणसिंह होळकर यांचं नाव शरद पवार गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असणार आहे.
काही दिवसांपूर्वी जेजुरीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी शरद पवारांच्या हस्ते होत असलेल्या या लोकापर्णणणाला होळकर कुटुंबीयांनी कडाडून विरोध केला होता. तसेच भूषण सिंह यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करत पवार कुटुंबीय होळकरांच्या सातबाऱ्यावर डोळा ठेवून असल्याचे म्हटले होते. मात्र आता त्याच भूषणसिंह होळकरांना राष्ट्रवादीत आणण्यात शरद पवारांना यश आले आहे.