“विखेंविरोधात प्रचार हाच त्यांचा धर्म”; शरद पवारांच्या नगर दौऱ्यावर मंत्री विखेंचा खोचक टोला

“विखेंविरोधात प्रचार हाच त्यांचा धर्म”; शरद पवारांच्या नगर दौऱ्यावर मंत्री विखेंचा खोचक टोला

Radhakrishna Vikhe Criticized Sharad Pawar : महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवार हे नगर जिल्ह्यात येणार आहे. याबाबत मंत्री विखे यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की शरद पवार हे आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या विरोधात प्रचारासाठी आले नाही तर ही एक मोठी बातमी होईल. जगात जे आश्चर्य आहेत त्यापैकी हे एक आश्चर्यच होईल. त्यामुळे शरद पवार हे प्रचाराला येणार यामध्ये नाविन्य काही नाही. विखेंविरोधात प्रचार करणे हा शरद पवारांचा धर्मच आहे, अशा शब्दात मंत्री विखे यांनी पवारांना जोरदार शाब्दिक टोला लगावला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महायुतीचे नगर दक्षिणेचे उमेदवार असलेले सुजय विखे यांच्या प्रचारासाठी नगर शहरातील कोहिनूर मंगल कार्यालय येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. यावेळी विखे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत विविध राजकीय विषयांवर भाष्य केले.

Ahmednagar Lok Sabha : महिलांना उमेदवारी देण्यात राजकीय पक्षांची पाठ; नगर-शिर्डीत पाटी कोरी

नगर दक्षिणेत महायुतीचे उमेदवार सुजय विखे असून महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नगर दक्षिणेत विखे विरुद्ध लंके असा सामना पाहायला मिळणार आहे. एकीकडे मुलासाठी स्वतः राधाकृष्ण विखे हे लोकसभेच्या प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत दुसरीकडे प्रतिस्पर्धी असलेले निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार हे नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहे.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून विखे विरुद्ध पवार हा राजकीय संघर्ष सर्वांनाच माहिती आहे. यातच यंदाच्या नगर दक्षिण लोकसभेवरून विखे हे विरुद्ध पवार हे समीकरण पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. लंकेना ताकद देण्यासाठी खुद्द शरद पवार हे लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. पवार हे नगर जिल्हा दौऱ्यावर येणा यावर भाष्य करताना मंत्री विखे म्हणाले की, शरद पवार हे आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या विरोधात प्रचारासाठी आले नाही ही एक मोठी बातमी होईल. जगाचे जगात जे आश्चर्य आहेत त्यापैकी हे एक आश्चर्यच होईल. त्यामुळे शरद पवार हे प्रचाराला येणार यामध्ये नाविन्य काही नाही. विखे विरोधात प्रचार करणे हा शरद पवारांचा धर्मच आहे.

Nilesh Lanke : सभेचे नियोजन फिस्कटले लंके परतले..जनसंवाद नव्हे तर ही फसवणूक यात्रा, भाजपचा हल्लाबोल

 

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज