Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांची इंदापूर मतदारसंघातील उमेदवारी जवळपास फायनल झाली. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याकडे आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली. त्यामुळं भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर काहीसे अडगळीत पडलेले हर्षवर्धन पाटील आता पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहेत.
माजी महापौर संदीप कोतकरांची जिल्हाबंदी उठवली, विधानसभेच्या रिंगणात उतरणार?
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून शरद पवार गटात जोरदार इन्कमिंग सुरू झालं. हर्षवर्धन पाटील यांनीही काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना महायुतीत तिकीट मिळणार असल्यानं हर्षवर्धन पाटील यांची कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. आता पाटील यांची आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांच्या पक्षच्या संसदीय मंडळावर नियुक्ती करण्यात आली.
माजी महापौर संदीप कोतकरांची जिल्हाबंदी उठवली, विधानसभेच्या रिंगणात उतरणार?
पक्षाकडून याबाबतचे नियुक्ती पत्र देताना हर्षवर्धन पाटील यांना उद्देशून म्हटलं की, सप्रेम नमस्कार, आपणास कळवण्यात आनंद होत आहे की, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने आपली राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये नियुक्त करण्यात येत आहे. संसदीय मंडळाची बैठक शनिवार, 19/10/2024 रोजी संध्याकाळी 05:00 वाजता, राष्ट्रवादी भवन, ठाकरसी हाऊस, जे. एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400001 येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीस आपण उपस्थित राहावं, असं आवाहन पाटील यांना कऱण्यात आलं.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे इंदापूरमधील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या या कार्यकर्त्यांना परिवर्तन मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात बोलताना हर्षवर्धन पाटलांविरोधात अपक्ष निवडणूत लढवण्याची भाषा केली गेली.
शरद पवार गटाने पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी दिली. त्यामुळं भाजपमध्ये गेल्यानंतर काहीसे अडगळीत आणि दुर्लक्षित असलेले हर्षवर्धन पाटील आता पुन्हा एकदा राज्य पातळीवर सक्रिय होणार आहेत.