माजी महापौर संदीप कोतकरांची जिल्हाबंदी उठवली, विधानसभेच्या रिंगणात उतरणार?

  • Written By: Published:
माजी महापौर संदीप कोतकरांची जिल्हाबंदी उठवली, विधानसभेच्या रिंगणात उतरणार?

नगर विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Eletion) तोंडावर माजी महापौर संदीप कोतकर (Sandeep Kotkar) यांच्यावरील जिल्हाबंदी उठण्यात आली. त्यामुळे कोतकर समर्थकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. संदीप कोतकर यांच्या जिल्हाबंदीवरील (District Ban)स्थगितीचा आदेश येताच त्यांच्या समर्थकांनी  अहिल्यानगरस  (ahilyanagar) केडगाव उपनगरात जल्लोष केला.

शरद पवारांचा भाजपला धक्का, आमदार गणेश नाईक तुतारी फुंकणार?

संदीप कोतकर आणि त्याच्या कुटुंबीयांना एका खुनाच्या आरोपाखाली शिक्षा झाली होती. या शिक्षेला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सध्या संदीप कोतकरसह त्यांचे संपूर्ण कुटुंब जामिनावर बाहेर आहे. मात्र सचिन कोतकर वगळता इतर सर्वांवर उच्च न्यायालयाने जिल्हाबंदी घालण्यात आली होती. त्यामुळेच संदीप कोतकर जिल्ह्यात येऊ शकत नव्हते. त्यांच्यावर जिल्हाबंदी करण्यात आली होती.

दरम्यान, जिल्हाबंदीच्या निर्णयाच्या विरोधात संदीप कोतकर यांनी अपील केले होते. त्यावर काय निर्णय लागतो याकडे सार्‍यांच्याच नजरा लागल्या होत्या. जिल्हाबंदीबाबत मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली. त्यानुसार संदीप कोतकर यांची जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आली.

मोठी बातमी : कोयना धरण अन् हेलिकॉप्टर अचानक खाली… मुख्यमंत्र्यांच्या हॅलिकॉप्टरचे ‘इमर्जन्सी लँडिंग’ 

कोतकर यांच्यावरील जिल्हाबंदी 20 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर या कालावधीसाठी हटविली आहे. या कालावधीत सोमवारी कोतवाली पोलिस स्टेशनला कोतकरांनी हजेरी द्यावी लागणार आहे. या निर्णयामुळे कोतकर यांना नगर शहरात प्रत्यक्ष येण्याचा मार्ग मोकळा झाला असून कोतकर समर्थकांत आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, कोतकर यांची जिल्हाबंदीची अट शिथील करण्यात आल्याचे वृत्त येताच या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. न्यायालयीन आदेशाची प्रत हाती पडताच ती प्रशासनाकडे सोपविण्याचे सोपस्कर करण्यात येणार असून त्यानंतर संदीप कोतकर हे नगर जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीपासून संदीप कोतकर हे निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, त्यांच्यासमोर जिल्हाबंदीचे मोठे संकट होते. आता त्यांच्यावरील जिल्हाबंदी उठण्यात आली. आता ते नगरमध्ये येऊन राजकारणात थेट भाग घेऊ शकतात.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube