शरद पवारांचा भाजपला धक्का, आमदार गणेश नाईक तुतारी फुंकणार?

  • Written By: Published:
शरद पवारांचा भाजपला धक्का, आमदार गणेश नाईक तुतारी फुंकणार?

Ganesh Naik : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. बहुतांश सत्ताधारी आमदार मविआच्या (Mahavikas Aghadi) घटकपक्षांध्ये प्रवेश करत आहेत. अशातच आता नवी मुंबईतील भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) हेही भाजप (BJP) सोडण्याच्या विचारात असल्याची माहिती सुत्रांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

मोठी बातमी! कमल व्यवहारे संभाजीराजेंच्या भेटीला, कसब्यात बंडखोरी होणार?

गेल्या अनेक दिवसांपासून गणेश नाईक हे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत नाईक समर्थकांनी ठाणे लोकसभेच्या जागेसाठी आग्रह धरला होता. मात्र, नाईक यांना उमेदवारी मिळाली नव्हती. भाजपकडून नाईक कुटुंबाला वारंवार दुर्लक्षित करण्यात येत असल्याची भावना नाईक कुटुंबीयांची आहे. त्यामुळं गणेश नाईक आणि भाजप नेते संदीप नाईक हे भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. ते तुतारी किंवा मशाल हाती घेण्यासाठी शरद पवार गटाच्या तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

मोहितेंसमोर नवी अडचण; चुकीचा उमेदवार दिला तर ‘तिसरा’ पर्याय देणार? खेडमध्ये सर्वपक्षीय नेते एकत्र 

2019 मध्ये गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, गणेश नाईक वगळता त्यांच्या कुटुंबातील कोणालाही उमेदवारी मिळाली नाही. तसेच गणेश नाईक यांना मंत्रिमंडळातही संधी मिळाली नाही.

आता गणेश नाईक हे ऐरोली मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तर संदीप नाईक हे बेलापूरमधून इच्छुक आहेत. मात्र, बेलापूर आणि ऐरोलची जागा मिळत नसल्याने ते भाजपमधून बाहेर पडण्याची चर्चा आहे.

नवी मुंबई परिसरात गणेश नाईक यांचे वर्चस्व आहे. नवी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे गणेश नाईक यांनी भाजप सोडल्यास नवी मुंबईतील भाजपचे वर्चस्व कमी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गणेश नाईक हे तुतारी  फुंकणार की, शिवसेनेची मशाल हाती घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विजय नाहटा यांचा पक्षप्रवेश लांबला

बेलापूरची जागा महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला असल्याने शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून तुतारी हाती घेणार होते. मात्र, नाईक यांचा पक्षप्रवेश रखडला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube