Download App

‘पवारांनी शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही, आता व्यापाऱ्यांसाठी गळे काढताहेत; अनिल बोडेंची टीका

  • Written By: Last Updated:

Anil Bonde on Sharad Pawar : कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीवर चाळीस टक्के कर लावला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. या निर्यात शुल्कावरून विरोधकांनी सरकारला चांगलचं धारेवर धरलं आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनीही निर्यात शुल्कावरून सरकारवर टीका केली होती. केंद्र सरकारचा हा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा नाही, असं ते म्हणाले होते. दरम्यान, शरद पवारांच्या टीकेचा आता भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी जोरदार समाचार घेतला. शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. आता विरोधकांना बोलायला नाक उरले नाही, अशा शब्दांत बोंडे यांनी टीका केली.

खासदार अनिल बोंडे यांनी आज अमरावतीत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी लादली नाही. त्यांनी केवळ 40 टक्के कर लावला आहे. कराचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर सरकारने लगेच नाफेडद्वारा दोन लाख टन कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कांद्याचा भाव 2410 रुपये जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, याची काळजी सरकार घेत असल्याचं बोंडे यांनी सांगितलं.

Beed : संदीप क्षीरसागरांविरोधात अजितदादांनी मिळाला पर्याय; थेट भावालाचा लावलं गळाला 

शरद पवार यांच्यावर टीका करताना अनिल बोंडे म्हणाले, खरंतर विरोधकांना बोलायला नाकही उरलं नाही. शरद पवार कृषीमंत्री असताना कांद्याची अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा त्यांनी अनियंत्रित कालावधीसाठी निर्यात बंदी लागू केली होती. सरकारने आता निर्यातीवर बंदी घातली नाही, फक्त 40 टक्के कर लावला आहे. साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांना आळा घालण्यासाठीच हा कर लावण्यात आला आहे.

ते म्हणाले, शरद पवारांनी त्यांच्या काळात शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कोणतही काम केलं नाही. हे शरद पवार विसरून जातात. कापसाची निर्यातही शरद पवारांनी थांबवली होती. कांद्याची निर्यात बंदीही त्यांनी केली होती. व्यापाऱ्यांना मर्यादित कालावधीत नफा मिळवून दिला होता. शेतकऱ्यांचे नुकसान केलं होतं, हे शरद पवार दुर्दैवाने विसरले आहेत. आता ते केवळ व्यापाऱ्यांसाठी गळे काढण्याचे काम करत आहेत,’ असा आरोपही खासदार बोंडे यांनी केला.

 

Tags

follow us