Ashok Chavan News : इंडिया आघाडीला भविष्य नाही म्हणूनच एक-एक पक्ष साथ सोडत असल्याची टीका भाजपचे नेते अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी केली आहे. दरम्यान, नूकताच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पहिल्यांदाच इंडिया आघाडीवर भाष्य केलं आहे.
Rahul Gandhi : ‘इलेक्टोरल बाँड’ भाजपाच्या भ्रष्ट धोरणांचा पुरावा’; राहुल गांधींचा हल्लाबोल
अशोक चव्हाण म्हणाले, इंडिया आघाडी काम करीत नाही, ही वस्तुस्थिती आहे. इंडिया आघाडीकडून जर काम होत नसेल तर ते जनतेला काय पर्याय काय देणार आहेत. त्यामुळेच एक एक करुन पक्ष सोडत असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. तसेच इंडिया आघाडीत काम होत नसल्याने आघाडीतील सहकाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, याच कारणामुळे लोक एक एक करून युती सोडत आहेत, त्यांना भविष्य दिसत नाही. असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
मुदत शिल्लक असतांनाच राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेलांच्या नावाची घोषणा
काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळख असलेले अशोक चव्हाण यांनी आज आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. अशोक चव्हाण यांच्या या राजीनाम्याच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या BJP चर्चा रंगू लागल्या होत्या. अखेर अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. भाजपात प्रवेश करताच त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.