Download App

Chitra Wagh : ‘कोंबड्यांच्या कलकलाटाला ताकद म्हणत नाही’; चित्रा वाघांचा राऊतांना खोचक टोला

Chitra Wagh replies Sanjay Raut : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत (Lok Sabha Election 2024) आहेत. राजकीय पक्षांकडून मतदारसंघांची चाचपणी केली जात असून जागावाटपाच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. जागावाटपावरून महाविकास आघाडीत मतभेदाच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र आघाडीत कोणतेच मतभेद नसल्याचे नेते सांगत आहेत. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही एक दोन जागांवरून आघाडीत तणावाची परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही, असे सांगितले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर भाजपा महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जोरदार टीका केली आहे. वाघ यांनी ट्विट करत संजय राऊत (Sanjay Raut) यांना खोचक टोला लगावला आहे. दहा तोंडांच्या रावणाप्रमाणे इंडी आघाडीतील पक्ष भांडत असतात, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

चित्रा वाघ यांनी एक ट्विट केले आहे. ‘तुमच्या इंडी (INDI) अलायन्समध्ये कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. दहा तोंडांच्या रावणाप्रमाणे एकमेकांशी भांडत असतात. बैठकीची जागा ठरवण्यावरून तुमच्यात एकमत होत नाही तर लोकसभेच्या जागा ठरवणं ही फार लांबची गोष्ट झाली. चिमूटभर दाण्यांसाठी एकमेकांशी झुंजणाऱ्या कोंबड्यांच्या कलकलाटाला ताकद म्हणत नाहीत’, अशी खोचक टीका भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

Chitra Wagh : ‘तुमची चॉईसचं वेगळी आहे’ मोठ्या ताई म्हणत चित्रा वाघांचा सुप्रिया सुळेंवर ‘वर्मी’ घाव

काय म्हणाले होते संजय राऊत ?

सुप्रिया सुळे जर म्हणत असतील की जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत आणि लवकरच घोषणा होईल. मीही स्वागत करतो. आम्ही सगळे स्वागत करतो. आम्ही सगळे एक आहोत. महाविकास आघाडीची वज्रमूठ हीच आमची ताकद आहे. एक दोन जागांवरून आम्ही आघाडीत तणावाची परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले होते.

follow us