सोमय्यांचा शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर; म्हणाले, 72 तासांत…

भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी त्यांच्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. 72 तासांमध्ये कारवाई झाली नाही तर मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये कारवाईला बसणार असा इशारा त्यांनी दिला आहे. ठाकरे सरकार असताना त्यांच्यवर हल्ला करण्यात आला होता. जर आता दोषींवर कारवाई न केल्यास आंदोलन करणार असे सोमय्या म्हणाले आहेत. 23 एप्रिल 2022 मध्ये रोजी सोमय्यांवर खार पोलिस […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 27T134547.999

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 27T134547.999

भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी त्यांच्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. 72 तासांमध्ये कारवाई झाली नाही तर मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये कारवाईला बसणार असा इशारा त्यांनी दिला आहे. ठाकरे सरकार असताना त्यांच्यवर हल्ला करण्यात आला होता. जर आता दोषींवर कारवाई न केल्यास आंदोलन करणार असे सोमय्या म्हणाले आहेत.

23 एप्रिल 2022 मध्ये रोजी सोमय्यांवर खार पोलिस स्टेशच्या परिसरात हल्ला करण्यात आला होता. ठाकरे गटाने हा हल्ला केल्याचा सोमय्यांचा आरोप आहे. पोलिस या प्रकरणामध्ये कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आता संतप्त झाले असून त्यांनी थेट राज्य सरकारला इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या फोटोला चपलांनी बडवणार का? राम कदमांचा सवाल

माझा जीव घेण्याचा प्रयत्न झाला होता. दगडफेक झाली होती. तरी खार पोलिस स्टेशनचे अधिकारी याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. माझी राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी जर 72 तासांमध्ये यावर कारवाई न केल्यास मी खार पोलिस स्टेशनमध्ये आंदोलनला बसणार आहे, असे सोमय्या म्हणाले आहेत.

दरम्यान, ठाकरे सरकार असताना खासदार नवनीत राणा व रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. तेव्हा रात्री उशीरा सोमय्या त्यांना भेटायला गेले होते. यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते व त्यांनी किरीट सोमय्यांचा गाडीवर हल्ला केला होती. त्यांच्या गाडीची काच फोडण्यात आली होती.

Maharashtra Politics : ‘मेव्हण्याला वाचण्यासाठी उद्धव ठाकरेंचा राजीनामा’

किरीट सोमय्या हे गाडीच्या मधल्या सीटवर बसले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर चपला व पाण्याच्या बाटल्या फेकल्या होत्या. त्यांच्या गाडीची काच फोडण्यात आली होती. यामध्ये सोमय्या जखमी देखील झाले होते. यानंतर सोमय्यांनी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली होती व जोपर्यंत हल्लेखोरांवर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत पोलिस स्टेशनच्या बाहेर पडणार नाही अशी भुमिका सोमय्यांनी घेतली होती. आता शिंदे-फडणवीस सरकारकडे या हल्लेखोलांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version