Download App

‘तो बालिश आहे’; नारायण राणेंनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली

  • Written By: Last Updated:

Narayan Rane On Aaditya Thackeray :  देशाचे केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. यावेळी ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते. आज मुंबई येथे पंतप्रधान मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी त्यांच्यासोबत शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते.

यावेळी त्यांना आदित्य ठाकरेंवर एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. तो बालिश आहे, असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. कोण आहे आदित्य ठाकरे, त्याला काय प्रतिष्ठा आहे. तो बालिश आहे. मला शाळेतल्या मुलांचे प्रश्न विचारु नका, असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे अनेक आमदार संपर्कात; फडणवीसांनी दिले मेगाभरतीचे संकेत, पक्ष प्रवेशाची वेळही सांगितली

याआधी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले होते व मला जेलमध्ये जायचे नाही त्यामुळे आपण ही आघाडी तोडूया, असे ते म्हणाले होते, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. यावरुन नारायण राणे यांनी आदित्य यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्याला संजय राऊत यांनी देखील दुजोरा दिला आहे.

उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत; फडणवीसाचं मोठं वक्तव्य

आदित्य ठाकरे जे बोलत आहे ते पूर्णपणे सत्य आहे. माझ्या घरात देखील येऊन त्यांनी हेच बोललेले होते की भाजपासोबत जायला पाहिजे नाहीतर जेलवारी करावी लागेल. आपल्याला हे  गठबंधन तोडलं पाहिजे. मी त्यांना एकच सवाल केला की आपल्याला हे असं का करायचं आहे जर पार्टीने आपल्याला संधी दिली आहे तर ती आपण निभावून दाखवू, असे राऊत यावर म्हणाले आहेत.

Tags

follow us