Nilesh Rane : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी गुहागर येथील जाहीर सभेत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर अत्यंत वादग्रस्त आणि तिखट भाषेत टीका केली होती. राणेंनी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना शिवीगाळ केली होती. ते जाधवांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र, आता एक व्हिडिओ जारी करून निलेश राणेंनी जन्या आठवणींना उजाळा दिला. तुमच्यासोबत अनेक आठवणी आहे, तुम्हाला काका म्हणायचो, त्या आठवणी आम्ही आजही विसरलो नाही, असं राणे म्हणाले.
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटीयाच्या मादक अदा, चाहत्यांचं वेधलं लक्ष
भास्कर जाधव काल रविवारी चिपळूणमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. इतकंच नाही आपल्या मुलाचं भाषण ऐकून जाधवांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या या सभेची दखल त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी निलेश राणे यांनीही घेतली. राणे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, भास्कर जाधव यांनी त्यांचे सहकारी त्यांना का सोडून गेले, यासाठी आत्मचिंतन केले पाहिजे. तुम्ही रडण्याचा कार्यक्रम बंद करा आणि कामाला लागा. तुमचे सहकारी तुमच्याकडे परततील की नाही बघा. मलाही तो काळ आठवतो, जेव्हा मी तुमच्या पाय पडायचो, तुम्हाला काका बोलायचो. मी देखील ते दिवस विसरलेलो नाही. तुमच्यासोबत अनेक आठवणी आहे, त्या आम्ही आजही विसरलो नाही, असं राणे म्हणाले.
Horoscope Today: आज ‘मेष’ राशीला मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
पुढं बोलतांना ते म्हणाले की, पण तुम्ही असेल वागत राहिलात तर आमच्यासारखी तरुण मुले जी तुमच्याकडे काका म्हणून आदराने पाहत होती, ती तुम्यापासून लांब गेली. तुम्ही डोंगरावर जाऊन एकटे बसा आणि या सगळ्याचा विचार करा, हा विचार करतांना मी कोण आहे ही भावना बाजूल ठेवा, असा सल्ला निलेश राणेंनी दिला.
चिपळूणच्या जनतेची फसवणूक करू नका
ते म्हणाले, आतातरी तुम्ही खोट बोलून चिपळूणच्या जनतेची फसवणूक करू नये. खोटे बोलण्याचं तुमचं वय नाही. हे वय नातवांडांना खेळवण्याचं आहे. नेहमी तुमच्या मदतीसाठी कोणतातरी सहकारी धावून येणार, ही अपेक्षा ठेवू नका. आताचं राजकारण तसं राहिले नाहीत. उद्धव ठाकरे तुमचा फक्त वापर करून घेतली, याचा अंदाज तुम्हाला आला असेल. चिपळूणमधील मागच्या घटनेनंतर हे तुमच्या लक्षात आले असेल. त्या घटनेनंतर तुम्हाला वाटले की महाराष्ट्रातील जनता तुम्हाला डोक्यावर घेईल, पण तसं झालं नाही. तुम्ही तुमच्याच दुनियेत मश्गूल आहात,त्यातून बाहेर पडा, असं राणे म्हणाले.