भास्कर जाधव गुजरात बॉर्डरपर्यंत आले, पण भाजपने नकार दिल्यानं…; रामदास कदमांचा मोठा दावा
Ramdas Kadam : काल दापोलीचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी मोठा गौप्यस्फोट केला. भास्कर जाधव हे देखील गुवाहटीला येण्यासाठी बॅंग भरून तयार झाले होते, असं योगेश कदम म्हणाले. त्यांच्या या दाव्यानंतर आता त्यांचे वडील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनीही मोठा दावा केला. उद्धव ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) बंड केलं तेव्हा भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे शिंदे गटात येणार होते. ते गुजरातच्या बॉर्डरपर्यंत आलेले… पण, भाजपने विरोध केल्यामुळं इच्छा असूनहरी त्यांनी अर्ध्या वाटेवरून माघारी फिरावं लागलं, असा खळबळजनक गौप्सस्फोट कदम यांनी केला.
‘खंडोजी खोपडेची अवलाद…’; रवींद्र वायकरांचे नाव घेता ठाकरेंचे टीकास्त्र
शिवसेना नेते रामदास कदम यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत कदम यांनी खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले, भास्कर जाधव गुजरातच्या बॉर्डरपर्यंत आले होते. पण, भास्कर जाधवांना सोबत घेण्यास भाजपचा नकार होता. कारण त्यांनी मोदींची नक्कल केली होती आणि भाजपचे 12 आमदारांना निलंबित केलं होतं. यावर आता भास्कर जाधव म्हणतील की मी गेलो नाही, मी एकनिष्ठ आहे. पण, एकनाथ शिंदे यांना तुम्ही खाजगीत विचाराल तर तेही तुम्हाला सांगतील, असे रामदास कदम म्हणाले.
बजरंग पुनिया आणि रवी दहियांचे ऑलम्पिकचे स्वप्न भंगले, पात्रता फेरीतच पराभव
कमद म्हणाले, भाजपने नकार दिल्यानंतर शिवसेना नेतृत्वाने त्यांना सांगितले की, तुम्ही त्यांना थोडे दिवस थांबा, आम्ही त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे भास्कर जाधव सुरतच्या बॉर्डवरून मागे फिरले होते… उद्या उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र आले तरी भाजप भास्कर जाधव यांना सोबत घेणार नाही. त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे भाजपसोबत गेल्यास आपले काय होईल, अशी भीती भास्कर जाधव यांना वाटत आहे. त्यामुळं ते उद्धव ठाकरेंना सांगतात की, तुम्ही भाजपमध्ये जायचं नाही, नाहीतर मी नसेन तुमच्यासोबत, असंही कदम म्हणाले.
भास्कर जाधवांमुळे उद्धव ठाकरे की उद्धव ठाकरेंमुळे भास्कर जाधव? एक आमदार पक्षाच्या नेत्याला सांगतोय, तुम्ही तिकडे जाल तर मी तुमच्यासोबत राहणार नाही, ही तर धमकी झाली? असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.
भास्कर जाधव यांच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. कारण हा माणूस नाटकी आणि नौटंकी आहे, त्यांनी एक नाटक कंपनी सुरू करावी, त्यात त्यांनी काम केलं तर त्यांची कंपनी खूप चांगली चालेल, ते नवकलाकार आहेत, आदित्य, उद्धव ठाकरे, बाळासाहेब आणि मोदींबद्दल बोलला आहेत. आणि पुन्हा तो मी नव्हेच असं सांगतात, अशी टीका रामदास कदमांनी केली. केली.