Sanjana jadhav : भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या मुलीच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर आलीयं. संजना जाधव (Sanjana jadhav) धुळे-सोलापूर महामार्गावरुन जात असताना रांजणगाव इथे हा अपघात घडला आहे. चाळीसगावमधील रांजणगावमध्ये समोरुन येणाऱ्या पिकअप चालकाने जाधव यांच्या गाडीला धडक दिलीयं. या अपघातात सुदैवाने संजना जाधव आणि कार्यकर्ते बचावल्या आहेत.
अजित पवारांचा एक फोन अन् उमेदवाराच्या नावाची घोषणा; रामराजे नाईक निंबाळकरांना हसू अवरेना
या अपघातामध्ये संजना जाधव थोडक्यात बचावल्या आहेत. धुळे-सोलापूर महामार्गावरील चाळीसगावमध्ये जाधव यांचा अपघात झाला आहे. समोरुन आलेल्या पिकअच्या चालकाने जाधव यांच्या गाडीला जोराची धडक दिली. हा अपघात घडताच प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. प्रत्यक्षदर्शींनी धाव घेताच संजना जाधव आणि गाडीतील कार्यकर्ते सुखरुप असल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्री साहेब, हीच तुमच्या महायुती सरकाची क्वालिटी का?, शालेय गणवेशावरून रोहित पवारांची टीका
संजना जाधव सोमवारी आपल्या गाडीतून कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जयेश बोरसे, ज्ञानेश्वर निकम, आदित्य गर्जे यांच्यासह कन्नडमधून नागद पट्ट्यातील बनोटी गावाकडे जात होत्या. यावेळी रांजणगाव फाट्याजवळून येणाऱ्या पिकअप गाडी चुकीच्या बाजूने भरधाव वेगाने येत होती. याचवेळी संजना जाधव यांच्या गाडीला पिकअपने जोरदार धडक दिल्याने अपघात घडला.
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम, धनंजय मुंडे यांची घोषणा
दरम्यान, माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे संजना जाधव यांचे पती होते. त्यांच्या कौटुंबिक वादानंतर दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. हर्षवर्धन जाधव आणि संजना यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर दोघेही पती पत्नी एकमेकांविरोधात कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे.
मोठी बातमी! महाराष्ट्र सरकार आर्थिक डबघाईला; वित्त विभागाच्या विरोधानंतरही अनेक योजनांना मंजुरी
यंदाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यात भाजपसह सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर महायुतीच्या प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आलीयं. त्यामुळे आता कन्नड विधानसभा मतदारसंघातून संजना जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, हर्षवर्धन जाधवही निवडणुकीत उतरणार का? हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.