पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कारकिर्दीला ९ वर्ष पूर्ण झाल्याने भाजप राज्यामध्ये जनसंपर्क अभियान राबविणार आहे. त्यानिमित्ताने बावनकुळे हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी बोलताना बाहेरुन पक्षात आलेल्या नेत्यांविषयी भाष्य केले आहे. काल एका कार्यक्रमात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी बोलताना मी पक्षाची आहे पण पक्ष माझा थोडीच आहे, असे विधान केले होते.
त्यामुळे भाजपमध्ये निष्ठावंतांवर अन्याय होतो आहे का असे बोलले जाते. याविषयी बावनुळे यांना विचारले असता त्यांनी याला उत्तर दिले आहे. ते म्हणाले,आमचा पक्ष अरबी समुद्रासारखा आहे. आमचा पक्ष महासागर आहे.या महासागरामध्ये कितीही मोठे नेतृत्व आलं किंवा छोटे नेतृत्व आलं, कोणत्याही पक्षातून आलं तरी आमच्याकडे खूप स्पेस आहे, असे ते म्हणाले.
जनताच काय ? बंगले, नवे वाहनेही पाहतायत नव्या मंत्र्यांची आतुरतेने वाट !
आम्ही एका विचारधारेने काम करणारे पदाधिकारी आहोत. आमच्याकडे खुप विंग्स आहे. समाजाच्या शेवटच्या बिंदूला समोर ठेवून काम करणारा आमचा पक्ष आहे. आमच्याकडे जवळपास ३५ विंग्स आहेत. तसेच ९ मोठे मोर्चे आहे. त्यामुळे पक्षामध्ये कोणीही आलं तरी त्याच्या क्षमतेप्रमाणे आम्ही त्यांना काम देतो. म्हणून ज्यांना भाजपमध्ये यायचं आहे, त्यांना माझी विनंती आहे, त्यांनी भाजपमध्ये यावं आम्ही त्यांना महासागरासारखं सामावून घेवू, असे म्हणत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना खुली ऑफरच दिली आहे.
शरद पवारांच्या भेटीत काय झाली खलबतं; एकनाथ शिंदेंनी थेट सांगितलं
बावनकुळेंच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. त्यामुळे आगामी काळात कोणता मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे का, याबाबत बोलले जात आहे. तसेच पंकजा मुंडे यांच्या बोलण्याचा विपर्यास केल्याचे त्यांनी म्हटले आहे. याऊलट भारतीय जनता पक्ष हा माझ्या पाठीमागे उभा असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले, असे म्हणत बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांची बाजू घेतली आहे.